मुंबई : मागासवर्गीय आयोगाचा अहवाल सकरात्मक असला तरी तो गोपनीय अहवाल आहे. त्याबाबत स्पष्ट माहिती नसल्याने मराठा क्रांती मोर्चाच्या उपोषणाची दिशा अहवाल सादर झाल्यावरच ठरवण्यात येईल अशी भूमिका उपोषण कर्त्यांनी घेतली आहे. आझाद मैदान येथे सुरु असलेल्या उपोषणाचा आजचा १३ वा दिवस असून उपोषणकर्ते विपुल माने यांची प्रकृती खालावलीय. त्यामुळे वैद्यकीय उपचाराची मागणीही केली जात आहे.
आता या आंदोलनानंतर काय निर्णय घेतला जाईल याकडे लक्ष आहे.