मायानगरीलाही दुष्काळाच्या झळा, शहरात पाणी कपातीची शक्यता

या कारणामुळे मुंबईत पाणी कपात जाहीर होणार 

Updated: Nov 14, 2018, 08:37 AM IST
मायानगरीलाही दुष्काळाच्या झळा, शहरात पाणी कपातीची शक्यता  title=

मुंबई : सध्या राज्यभरात आलेली दुष्काळाची लाट पाहता याची झळ आता थेट मायानगरी मुंबईपर्यंत पोहोचली आहे. यंदाच्या वर्षी पावसाच्या प्रमाणात मोठी घट झाल्यामुळे मुंबईत पाणी कपात जाहीर करण्यात येण्याची शक्यता आहे. 

स्थायी समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात येणार असल्याचं कळत आहे. या वर्षासाठी जवळपास १० टक्के पाणी कपात लागू करण्याचा निर्णय लागू होण्याची शक्यता आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत एकूण नऊ टक्के पाणी साठा कमी झाल्यामुळे अखेर हा निर्णय घेण्यात येणार असल्याचं जवळपास स्पष्ट झालं आहे. 

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सर्व धरण क्षेत्रांमध्ये अतिशय कमी प्रमाणात पाऊस झाल्यामुळे तलावांमध्ये पुरेसा पाणीसाठा नसल्यामुळे हा निर्णय घेण्यात येत असल्याचं सांगितलं जात आहे.

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठा हा दोन लाख दशलक्ष लीटरपेक्षा कमी झाल्यामुळेच या अडचणीचा सामना मुंबईकरांना करावा लागणार आहे. 

तेव्हा आता स्थायी समितीकडून पाणी कपातीविषयीचा हा निर्णय नेमका कधी जाहीर करण्याच येतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तुर्तास रहिवाशांना पाणी जपून वापरण्याचा इशारा यापूर्वीच शहरातील अनेक सदनिकांमधून आणि रहिवासी संघांमधून देण्यात आला आहे.