मुंबई : आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा मोर्चानं मुंबईसह अनेक राज्याच्या भागात बंद पुकरला असला तरी या बंदमधून अत्य़ावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहे. मुंबईच्या परळ परिसरात असलेल्या केईएम रूग्णालयात राज्यातूनच नाही तर देश-विदेशातूनही लोकं उपचारासाठी येत असतात. दररोज हजारो रुग्ण केईएम रुग्णालयात येत असतात. पण रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची गैरसोय होऊ नये म्हणून मराठा मोर्चाच्या आंदोलकांनी काळजी घेतली आहे.
मराठा समाजाचं आज मुंबईत आंदोलन सुरु असलं तरी रुग्णालयासमोरील हॉटेल्स चालू ठेवण्यात आली आहेत. अत्यावश्यक सेवा, रुग्णालय, मेडिकल आणि हॉटेल्स या भागात सुरु आहेत. रुग्ण आणि रुग्णाच्या नातेवाईकांना त्रास होऊ नये म्हणून मराठा आंदोलकांनी काळजी घेतली आहे.
केईएम परिसरातून झी 24 तासचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांनी घेतलेला आढावा.