mankhurd fire: मानखुर्दमध्ये भंगाराच्या गोदामात आग, अग्निशमन दलाच्या 16 गाड्या घटनास्थळी

आजूबाजूला झोपडपट्टीचा भाग असल्यानं आग पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Updated: Feb 5, 2021, 04:23 PM IST
mankhurd fire: मानखुर्दमध्ये भंगाराच्या गोदामात आग, अग्निशमन दलाच्या 16 गाड्या घटनास्थळी title=

मानखुर्द: मुंबईतल्या मानखुर्द भागातील मंडाळा इथे भंगारच्या गोदामाला भीषण आग लागली आहे. दुपारी 2.40 च्या सुमारास ही आग लागली होती. आगिमुळे आकाशात मोठमोठे धुराचे लोट उठले आहेत.

मानखुर्द इथे लागलेल्या आगीचं कारण अद्याप समोर आलं नाही. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 15 ते 16 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. 

या आगीमध्ये सध्या कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. मात्र 16 ते 16 अग्निशमन दलाच्या गाड्या माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. सध्या युद्धपातळीवर आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. LEVEL-3 ची आग असल्याचं सांगितलं जात आहे. आजूबाजूला झोपडपट्टीचा भाग असल्यानं आग पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

ही आग वेगानं पसरत आहे. आजूबाजूला झोपडपट्टी आणि वसाहत आहे. दाटीवाटीचा परिसर असल्यानं मोठा अनर्थ घडू शकतो. त्यामुळे अग्निशमन दलाकडून ही आग विझवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.