Ed Sheeran’s Concert: अलीकडेच लोकप्रिय गायक एड शिरीन याची मुंबईतील रेसकोर्स येथे 16 मार्च रोजी कॉन्सर्ट झाली होती. बॉलिवूडच्या कलाकारांसह अनेक भारतीय चाहत्यांनी त्याच्या या कॉन्सर्टला हजेरी लावली होती. मात्र, एड शिरीनच्या कॉन्सर्टमधील एका तरुणाचा फोटो चांगलाच व्हायरल होतोय. कॉन्सर्टमध्ये उपस्थित असणाऱ्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेणारा हा फोटो होता. एका तरुणाने एक साधे टी-शर्ट परिधान घेतलं होतं. त्याच्या मागे एक क्यु-आर कोड छापला होता. टी-शर्डवरील क्यु-आरकोडमुळेच त्याच्याकडे लक्ष जात होते. नेमका हा काय प्रकार होता जाणून घेऊया.
तरुणाने परिधान केलेल्या टी-शर्टवर एक क्यु-आर कोड होता. जेव्हा लोकांनी त्याच्या टीशर्टवरील क्यु-आर कोड स्कॅन केला तेव्हा त्यांनीही आश्चर्य व्यक्त केले. एका तरुणीने हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यामुळं ही चर्चा रंगली आहे. व सगळीकडे हा क्युआर कोड नेमका काय आहे? याचीच उत्सुकता आहे.
या तरुणाच्या टीशर्टवर क्युआर कोड व्यतिरिक्त एक मेसेजदेखील लिहला होता. यावर लिहलं होतं फक्त सिंगल लोकांसाठीच. श्वेता नावाच्या एका युजरने ट्विटर (एक्स)वर या तरुणाचा फोटो शेअर करत लिहलं आहे की, काल रात्री मुंबईतील एका कॉन्सर्टमध्ये या तरुणाला पाहिलं. क्युआर कोड स्कॅन करताच त्याचे टिंडर प्रोफाइल ओपन होतंय. हार्दिक असे त्याचे नाव आहे. 22 वर्षांच्या हार्दिकने सोशल मीडियावर क्युआर कोड वाला म्हणत सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. त्याने त्याच्या पहिल्या डेटसाठी भन्नाट आयडिया लढवली आहे. तर अनेकांनी त्याच्या या आयडियाचे कौतुक
केल आहे.
Saw this guy at a concert in Mumbai last night (the qr code opens his tinder profile) pic.twitter.com/uuTgEwi5Ro
— Shweta Kukreja (@ShwetaKukreja_) March 17, 2024
या तरुणाने त्याच्या टिंडर प्रोफाइलमध्ये लिहलं आहे की, पाहा मला कोणी शोधून काढलं आहे. मी तोच आहे ज्याला तु कॉन्सर्टमध्ये स्कॅनर असलेले टी-शर्ट घातलेला पाहिला होता. पहिल्या डेटसाठी आयस्क्रीन खाणे एक चांगला प्लान आहे. तुमचा काय विचार आहे? हार्दिकची पहिली डेटची ही आयडिया अनेकांना आवडली आहे. सोशल मीडियावर त्याचे भरभरुन कौतुक होत आहे.
एका युजरने म्हटलं आहे की, क्युआर कोडच्या माध्यमातून पेमेंट करण्याच्या या जमान्यात हा एकच क्युआर आहे जे मला स्कॅन करण्याची इच्छा आहे. तर एकाने म्हटलं आहे की, त्याची क्रिएटिव्हीटीच सांगतेय की तो माझ्यासाठी परफेक्ट पार्टनर आहे. मी हा क्युआर कोड स्कॅन करतेय, असं एकीने म्हटलं आहे.