दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात राज्य काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल होणार असल्याची माहिती मिळत आहे.
या फेरबदलाच्या दिशेने काँग्रेसचे पहिले पाऊल टाकत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अंतर्गत येणारे बारा सेल बरखास्त करण्यात आले आहे.
बरखास्त सेलवर लवकरच नव्या कार्यकर्त्यांच्या नियुक्त्या केल्या जाणार असल्याची माहिती झी २४ तासला मिळाली आहे.
तसेच लवकरच तालुका, जिल्हा तसेच प्रदेश पातळीवरील कार्यकारिणीतही मोठे फेरबदल केले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान राज्यात पन्नास टक्के नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार आहे. आगामी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची तयारीचा भाग म्हणून हे बदल करण्यात येणार आहे.