पाहा काय आहे हवामान खात्याचा पावसाविषयी अंदाज

राज्यातील बळीराजासाठी ही अत्यंत महत्वाची बातमी आहे, येत्या १५ जुलैनंतर कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुन्हा एकदा पावसाला सुरुवात होणार आहे.  

Updated: Jul 10, 2017, 06:42 PM IST
पाहा काय आहे हवामान खात्याचा पावसाविषयी अंदाज title=

मुंबई :  राज्यातील बळीराजासाठी ही अत्यंत महत्वाची बातमी आहे, येत्या १५ जुलैनंतर कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुन्हा एकदा पावसाला सुरुवात होणार आहे.  मुंबईच्या कुलाबा वेध शाळेच्या  अंदाजानुसार आगामी  चार दिवसात राज्यात पावसची शक्यता नाही. मात्र 15 जुलैनंतर कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मान्सून सक्रीय होणार आहे. 

राज्यात पावसासाठी पोषक वातावरण नसल्यामुळे सध्या पावसाने खंड दिला आहे. पावसाने ओढ दिल्यामुळे राज्यभरात खरीपाची पीकं धोक्यात आली असून बळीराजा आभाळाकडं डोळे लावून बसला आहे.

 मान्सून पूर्व तसेच मृग नक्षत्रात झालेल्या पावसानंतर शेतक-यांनी पेरण्या केल्या मात्र त्यानंतर खंड पडल्यामुळे जमीनीवर आलेली पीकं करपू लागली आहेत.  

आता पीकांना गरज आहे ती पावसाच्या सरींची... तरचं खरीपाची पीकं तग धरु शकणार आहेत. अन्यथा  शेतक-यांना दुबार पेरणीची वेळ येणार आहे. कुलाबा वेधशाळा अंदाजानुसार येत्या ४८ तासात  सिंधूदुर्ग, पालघर आणि ठाणे जिल्हात मुसळधार पावसाची शक्यता आहे.