मुंबई : महिंद्रा अॅण्ड महिंद्रा कंपनीने सामाजिक भान जपण्याची किमया सातत्याने करत आली आहे. कोरोनाचे संकटाविरुद्ध लढण्यासाठी महिंद्रा अॅण्ड महिंद्रा कंपनीने अॅम्ब्युलन्सची सेवा उपलब्ध करुन दिली आहे. महिंद्रा अॅण्ड महिंद्रा कंपनीने बीएस ६ सुप्रो अॅम्ब्युलन्स लॉन्च केली आहे. कंपनीने या अॅम्ब्युलन्सची आपल्या लोकप्रिय सुप्रो व्हॅन प्लॅटफॉर्मवर निर्मिती केली आहे. या अॅम्ब्युलन्सची मुंबईत एक्स-शोरुमची किंमत ६.९४ लाख रुपये आहे. महिंद्रा अॅण्ड महिंद्रा कंपनीने एलएक्स आणि झेडएक्स या दोन व्हेरिंएंटमध्ये अॅम्ब्युलन्स लॉन्च केली आहे.
दरम्यान, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा कंपनीने अॅम्ब्युलन्सची पहिली बॅच महाराष्ट्र सरकारसाठी बनवली आहे. जेणेकरुन कोरोना विषाणूशी सामना करण्यासाठी मदत होणार आहे. या अॅम्ब्युलन्सला महिंद्राचे डिआय इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन ४७ एचपी पॉवर आणि १०० एनएम टॉर्ख जनरेट करते. भारतीय रस्त्यांतवर ही अॅम्ब्युलन्स चांगल्या पद्धतीने धावेल याचा विचार करुन तयार करण्यात आली आहे.
Twelve Mahindra ambulances put in service in Mumbai to fight Covid, courtesy ZEE. @MahindraRise pic.twitter.com/U4bUjfuaFv
— Pawan K Goenka (@GoenkaPk) June 14, 2020
अॅम्ब्युलन्समध्ये फोल्डेबल स्ट्रेचर आणि ट्रॉली, मडिकल किट बॉक्स,ऑक्सिजन सिलिंडर, अग्निशामक यंत्र, आग प्रतिरोधक इंडिरिअर तसेच घोषणा प्रणाली प्रमाणे फीचर्स देण्यात आले आहेत. बाहेरील बाजूस एआयएस १२५ प्रमाणित रेट्रो रिफ्लेक्टीव्ह डिकेल्स ७५ टक्के फ्रॉस्डेट विंडोज आणि निळा दिवा असलेल्या सायरनने ही अॅम्ब्युलन्स सज्ज असणार आहे.
महिंद्रा अॅण्ड महिंद्रा कंपनीने या अॅम्ब्युलन्सची खास निर्मिती ही आरोग्य सेवेसाठी केली आहे. कोरोनाच्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी ही अॅम्ब्युलन्स तयार केल्याचे कंपनीकडून सांगण्यात आहे.