मविआने निराशा केली, कठोर निर्णय घेण्याची वेळ! राजू शेट्टी यांचे संकेत

स्वाभिमानी शेतकरी संघटना भाजपशी हातमिळवणी करणार?

Updated: Mar 18, 2022, 06:53 PM IST
मविआने निराशा केली, कठोर निर्णय घेण्याची वेळ! राजू शेट्टी यांचे संकेत title=

मुंबई : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (swabhimani shetkari sanghatana) सर्वेसर्वा राजू शेट्टी (Raju Shetty) हे महाविकास आघाडी सरकारमधून (Mahavikas Aghadi Government) बाहेर पडण्याची शक्यता आणखी दाट झाली आहे. राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी शुक्रवारी 'बोलताना तसे संकेत दिले. महाविकास आघाडीने आमची सर्व पातळ्यांवर निराशा केली आहे, असं राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे

त्यामुळे मविआ सरकारमधून बाहेर पडण्याच्या कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकारिणीच्या 5 एप्रिल रोजी होणाऱ्या कार्यकारिणीच्या बैठकीत कठोर निर्णय घेतला जाईल, असे राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे. 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने एकत्रितरित्या महाविकास आघाडी सरकारमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. विधानपरिषदेत स्वाभिमानीला एक जागा देण्याचा शब्द दिला होता, हा शब्द पाळायचा की नाही हा त्यांचा प्रश्न आहे, पण ज्या किमान समान कार्यक्रमावर मविआ तयारी झाली त्याचं काय झालं असा सवाल राजू शेट्टी यांनी उपस्थित केला आहे. 

भाजपाच्या सगळ्याच योजना नावं ठेवण्यासारख्या नव्हत्या, असंही राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे. त्यामुळे लवकरच राजू शेट्टी भाजपसोबत हातमिळवणी करण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. 

भाजपकडून राजू शेट्टी यांना ऑफर
राजू शेट्टी हे शेतकर्‍यांचे नेते आहेत, त्यांचीही काही प्रश्न असतात, त्यांनी दिल्लीत जंतरमंतर येथे जाऊन आंदोलन करावे, आम्ही देखील त्या आंदोलनात सहभागी होऊ, असं भाजप (BJP) नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी म्हटलं आहे. राजू शेट्टी हे झुंजार नेते आहेत, लढवय्ये नेते आहेत, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ते प्रामाणिकपणे लढत असतात, राजू शेट्टी हे महाविकास आघाडी मधून बाहेर पडून भाजप सोबत यायला तयार असतील तर त्याचे स्वागत आहे, असंही चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.