1500 मिळाले, आता लाडक्या बहिणींना सरकारकडून मोफत हवीय 'ही' सुविधा; सर्वेक्षणातून खुलासा

Maharashtra Vidhansabha Election 2024 : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका तोंडावर असतानाच मतदार म्हणून महिलांची काय मागणी आहे... पाहा   

सायली पाटील | Updated: Oct 1, 2024, 08:59 AM IST
1500 मिळाले, आता लाडक्या बहिणींना सरकारकडून मोफत हवीय 'ही' सुविधा; सर्वेक्षणातून खुलासा  title=
Maharashtra Vidhansabha Election 2024 Survey ladki Bahin scheme Wants Free Best Bus Services know more

Maharashtra Vidhansabha Election 2024 : महाराष्ट्रात सध्या आगामी विधानसभा निवडणुकीची वातारणनिर्मिती सुरू झाली असून, सत्ताधाऱ्यांसह विरोधकही सध्या मोर्चेबांधणीला लागले आहेत. अशा या राजकीय धामधुमीत अनेक योजनांची सरबत्ती शासन करताना दिसत आहे. त्यातच जनमानसाचं काय मत, त्यांच्या नेमक्या मागण्या आहेत तरी काय यासंदर्भातील माहिती देणारं एक सर्वेक्षणही नुकतंच समोर आलं आहे. ग्रीनपीस इंडिया द्वारा करण्यात आलेल्या 'फेयर फ्री फ्यूचर' या सर्वेक्षणातून महिलांच्या मागण्या समोर आल्या आहेत. 

सार्वजनिक प्रवासापासून इतरही अनेक सुविधांसंदर्भातील महिला वर्गाच्या या मागण्या सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. सर्वेक्षणातील माहितीनुसार 94 टक्के महिलांनी मोफत, सुलभ आणि सुरक्षित सार्वजनिक प्रवास अर्थात बस सेवांची मागणी केली आहगे. तर, 40 टक्के महिलांनी अशा पक्षांचं समर्थन करण्याचं मत मांडलं आहे जे त्यांच्या जाहिरनाम्यात मोफत बस सेवांच्या योजनेचा समावेश करतील. 

सर्वेक्षणातील आकडेवारीनुसार दर दिवशी जवळपास 46 टक्के महिला दरसदिवशी बेस्ट बसनं प्रवास करतात. यामध्ये काही महिलांनी बसची संख्या वाढवण्याची मागणी केली आहे. तर, 20 टक्के महिलांनी विनयभंग आणि लैंगिक अत्याचारासंदर्भात चिंता व्यक्त केली आहे. एकंदरच सध्या महाराष्ट्र आणि प्रामुख्यानं मुंबई शहरातील लाडक्या बहिणींनी त्यांच्या खात्यात योजनेचे 1500 रुपये आल्यानंतर आता सरकारपुढं आणखी काही मागण्यांची यादी केली आहे. तेव्हा आता या मागण्यांना केंद्रस्थानी ठेवत सत्ताधारी विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवर हा मुद्दा विचारात घेणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. 

हेसुद्धा वाचा : 'मी ऑफिसला पोहोचलोय गं...' पत्नीला अखेरचा मेसेज करून बँक अधिकाऱ्याची Atal Setu वरून उडी 

शहरातील महिलांची अर्थार्जनाची क्षमता पाहता 57 टक्के महिलांचं मासिक वेतन 10000 रुपयांहूनही कमी आहे. यापैकी काही महिलांच्या मते बसभाडं महाग पडत असून, ही दरवाढ कमी करावी आणि त्यासोबतच महिलांसाठी बस प्रवास अधिक सुरक्षित करण्यावर भर दिला जावा अशी मागणी केली. 92 टक्के महिलांनी बसमधील, प्रवासातील गर्दीचा प्रश्न उपस्थित केला, तर 57 टक्के महिलांनी सार्वजनिक शौचालयांची कमतरता प्रवासात अडचणी आणत असल्याचा सूरही आळवला.