Anil Parab Ed Summoned : अनिल परब यांना ईडीकडून समन्स

Anil Parab Ed Summoned :  परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीने पुन्हा एकदा समन्स बजावलं आहे. 

Updated: Jun 14, 2022, 10:38 PM IST
Anil Parab Ed Summoned : अनिल परब यांना ईडीकडून समन्स title=

कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई : राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीने पुन्हा एकदा समन्स बजावलं आहे. या समन्सनुसार परिवहनमंत्री यांना उद्या बुधवारी चौकशीसाठी हजर रहावं लागणार आहे. (maharashtra transport minister anil parab summoned by ED in money laundering case)

नक्की प्रकरण काय? 

अनिल परब यांना दापोलीतील साई रिसॉर्टप्रकरणी हे समन्स पाठवण्यात आलं आहे. ईडीने परब यांच्या विरोधात मनी लाँड्रिंगचा गुन्हा नोंदवला होता. तसेच परब यांच्या दोन निवासस्थानांसह सुमारे 7 ठिकाणी छापा टाकला होता. कोस्टल रेग्युलेटरी झोन ​​(CRZ) नियमांचे उल्लंघन करून बांधण्यात आलेल्या रिसॉर्टच्या संदर्भात हा गुन्हा दाखल करण्यात आला. 

दरम्यान कॅबिनेट मंत्री नवाब मलिक आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही यापूर्वी वेगवेगळ्या मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आली होती. 

अनिल परब यांना ईडीचं समन्स