आत्ताची मोठी बातमी, अजित पवार विलिनीकरणाच्या मागणीवर म्हणाले..........

एसटी कर्मचाऱ्यांच्या (ST Strike) प्रमुख मागणीवरुन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. 

Updated: Dec 24, 2021, 08:09 PM IST
आत्ताची मोठी बातमी, अजित पवार विलिनीकरणाच्या मागणीवर म्हणाले..........  title=

मुंबई : एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्यात यावं, या मागणीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून एसटी कर्मचारी आझाद मैदानात आंदोलनाला बसले आहे. या कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागणीवरुन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. एसटीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण होणार नाही, कुणाचेही सरकार असले तरी हे शक्य होणार नाही, अशा स्पष्ट शब्दातच अजित पवारांनी भूमिका मांडली. ते  विधानसभेत बोलत होते. यावेळेस त्यांनी विलिनीकरणाबाबत भूमिका मांडली. (Maharashtra ST will not be merged in state government it will not be possible even if there is any government says deputy chief minister ajit pawar at mumbai during to winter Session)

अजित पवार जे म्हणाले ते जसच्या तसं

- एसटी संप मिटविण्यासाठी आम्ही चर्चा केली, सकारात्मक भूमिका घेतली होती. 

- प्रत्येकाने हट्ट केला विलिनीकरण करा, आम्हाला सरकारमध्ये घ्या तर ते कुठल्याही सरकारला ते शक्य होणार नाही.  

- त्यांना चांगला पगार मिळाला पाहिजे, सुविधा मिळाल्या पाहिजेत ते करत आहोत. 

-त्यांच्या पगारात वाढ केली आहे. पगार १० तारखेपर्यंत देण्याची हमी दिली आहे. 

-प्रत्येक आमदाराने आपापल्या भागातील कर्मचाऱ्यांची समजूत काढली पाहिजे. 

-मुलांच्या शाळा सुरू झाल्या आहेत. एसटी बंद असल्याने सर्वसामन्यांचे हाल होत आहेत. 

- विलिनीकरण कधी तरी होईल, हे डोक्यातून काढून टाका.
 
-टोकाची भूमिका घेऊन गिरणी कामगारांची वाट लागली. 

-आम्ही एसटी कर्मचाऱ्यांबाबत हे होऊ देणार नाही.

- आम्ही चांगली पगारवाढ केली, एवढी सकारात्मक भूमिका घेतली. 

-एसटीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण होणार नाही, कुणाचेही सरकार असले तरी हे शक्य होणार नाही.