"शरद पवार यांच्याशी बोलणं झालंय..."; अजित पवार यांच्या डावपेचानंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया

Ajit Pawar Deputy CM : राज्याच्या राजकारणात अजित पवार यांनी दुसऱ्यांदा मोठा भूकंप केला आहे. अजित पवार हे राष्ट्रवादीच्या आमदारांसह शिंदे फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहेत.

Updated: Jul 2, 2023, 03:03 PM IST
"शरद पवार यांच्याशी बोलणं झालंय..."; अजित पवार यांच्या डावपेचानंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया title=

Maharashtra Political Crisis : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप झाला आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) राष्ट्रवादीच्या (NCP) आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. अजित पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. यासोबत राष्ट्रवादीचे काही आमदार देखील राजभवनात शपथ घेणार आहे. यावर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.

"महाराष्ट्राच्या राजकारणाचे साफ मातेरे करण्याचां विडा काही लोकांनी उचलला आहे. त्यांना त्यांच्या मार्गाने जाऊ द्या. माझे आताच श्री.शरद पवार यांच्याशी बोलणे झाले.ते म्हणाले" मी खंबीर आहे. लोकांचा पाठिंबा आपल्याला आहे. उद्धव ठाकरें सह पुन्हा सर्व नव्याने उभे करू.". होय,जनता हे खेळ फार काळ सहन करणार नाही," असे संजय राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार यांनी राजभवनात उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. या शपथविधी सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.

या शपथविधी सोहळ्यासाठी रविवार सकाळपासून राजभवनात हालचाल सुरू होती. त्यामुळे अजित पवार हे राष्ट्रवादीत बंडखोरी करून सरकारमध्ये दाखल होणार हे निश्चित झाले होते. त्या चर्चांना आता पूर्ण विराम लागला आहे. अजित पवार हे नऊ आमदारांसह सरकारमध्ये सामील झाले आहेत.