मुंबई : खार पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका प्राध्यापकाला विद्यार्थीनीचा विनयभंग केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. वांद्रातल्या एका महाविद्यालयात दुसऱ्या वर्षाच्या आर्ट्स विषयाचा पेपर सुरु होता. पीडित विद्यार्थिनी ही पेपर लिहीत होती आणि त्याचवेळी या प्राध्यापकाने त्या विद्यार्थीनीच्या अगदी जवळ जाऊन तिचा विनयभंग केला, अशी तक्रार त्या विद्यार्थिनीने पोलिसांकडे केली.
त्यांतर पोलिसांनी प्राध्यापकाला ताब्यात घेतले. या तक्रारीच्या अनुषंगाने खार पोलिसांनी शिक्षकाला अटक करून न्यायालयात नेले. न्यायालयाने आरोपी शिक्षक विजयला न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर त्याला जामीनही मंजूर करण्यात आला. या संपूर्ण घटनेचा तपास खार पोलीस ठाणे करत आहे.
0