विधीमंडळ हिवाळी अधिवेशन आजपासून, महाविकास आघाडीची कसोटी

Maharashtra Legislature winter session : महाराष्ट्राचा हिवाळी अधिवेशन आजपासून मुंबईत सुरू होत आहे.  

Updated: Dec 22, 2021, 09:49 AM IST
विधीमंडळ हिवाळी अधिवेशन आजपासून, महाविकास आघाडीची कसोटी title=
संग्रहित छाया

मुंबई : Maharashtra Legislature winter session : महाराष्ट्राचा हिवाळी अधिवेशन आजपासून मुंबईत सुरू होत आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेणार आहेत.

राज्यात पीक विम्याची रक्कम न मिळणे, शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कट करणे, शहरी भागात सेवा सुविधांचा अभाव, परीक्षांमधील गोंधळ, एसटी संप आणि भ्रष्टाचाराच्या रॅकेट या मुद्द्यावरून सरकारच्या विरोधात विरोधक आक्रमक होतील. 

अतिवृष्टीमुळे विदर्भ कोकणात नुकसान भरपाई अजून मिळाली आहे. या संदर्भात देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, राधाकृष्ण विखे पाटील यांनी विशेष लक्षवेधी आज मांडली आहे. यावर सरकारने काय उत्तर देते याकडे लक्ष आहे.

भाजापचे 12 निलंबित आमदार ही विधीमंडळ सभागृह बाहेर आंदोलन करत महाविकास आघाडी सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतील. एकूणच अधिवेशनाचा पहिला दिवस आज वादळी ठरण्याची शक्यता अधिक आहे.