Amruta Fadnavis : अमृता फडणवीस यांचा मोठा निर्णय

राज्य सरकारने अमृता फडणवीस यांच्या सुरक्षेत वाढ करुन एक्स दर्जावरुन (X Plus Security) वाय प्लस (Y PLus Security) दर्जाची सुरक्षा दिली होती.   

संजय पाटील | Updated: Nov 2, 2022, 04:41 PM IST
Amruta Fadnavis : अमृता फडणवीस यांचा मोठा निर्णय  title=

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी आणि बँकर अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) या कायम चर्चेत असतात. महाविकास आघाडीवर (Mahavikas Aghadi) टीका असो किंवा सामाजिक कार्यात हातभार असो त्या कायम एक्टिव्ह असतात. मिसेस फडणवीस यांनी मोठा निर्णय घेतला आहे. मिसेस फडणवीस यांना राज्य सरकारने दिलेली सुरक्षा नाकारली आहे. (maharashtra home minister devendra fadnavis wife amruta fadnavis rejected traffic clearnace vehicle service)

राज्य सरकारने अमृता फडणवीस यांच्या सुरक्षेत वाढ करुन एक्स दर्जावरुन (X Plus Security) वाय प्लस (Y PLus Security) दर्जाची सुरक्षा दिली होती.  यासोबतच  मिसेस फडणवीस यांना वाहतूक पोलिसांची सुरक्षाही देण्यात आली होती. मात्र मला सामन्य माणसाप्रमाणेच जगायचंय असं सांगत मिसेस फडणवीस यांनी वाहतूक पोलिसांची सुरक्षा नाकारली आहे. 

समाजातील हाय प्रोफाईल लोकांसोबत प्रवासादरम्यान कडेकोट सुरक्षा असते. घराबाहेर पडताना त्यांच्या गाडीसह मोठा लवाजमा असतो. मात्र यामुळे वाहतूक कोंडी होण्याची शक्यता असते. याच गोष्टीची जाणीव ठेवत अमृता यांनी हा निर्णय घेतला. "मला ट्राफिक क्लिअरन्स व्हीकल देऊ नका, मला सर्वसामान्यांसारखं जगायचंय", असं स्पष्टीकरण अमृता फडणवीस यांनी दिलं. 

बोललं तसं करुनही दाखवलं

अमृता फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी वाहतूक कोंडीमुळे 3 टक्के घटस्फोट होतात असा दावा केला होता. मात्र अमृता फडणवीस यांनी वाहतूक पोलिसांची सुरक्षा नाकारून वाहतूक कोंडीबाबत टीकाच करत नाहीत, तर ती होऊ नये यासाठी आपण काळजीही घेतो, हेच आपल्या निर्णयातून दाखवून दिलंय. 

अमृता फडणवीस काय म्हणाल्या होत्या? 

"मुंबईत वाहतूक कोंडीमुळे 3 टक्के घटस्फोट होतात. लोक वाहतूक कोंडीत अडकून असतात. त्यांना त्यांच्या कुटुंबियांना द्यायला वेळच मिळत नाही" असा दावा मिसेस फडणवीस यांनी फेब्रुवारी 2022 मध्ये केला होता.