मुंबई : राज्यात सत्तानाट्य सुरु असताना महाविकास आघाडीने राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत 3 मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. राज्य सरकारने अखेर 3 नामांतरणाच्या मुद्द्याला मंजूरी दिली आहे. त्यानुसार आता औरंगाबाद आणि उस्मानाबाद ही शहरं नव्या नावाने ओळखली जाणार आहेत. तर नवी मुंबईच्या प्रस्तावित विमानतळाला दि बा पाटील यांचं नाव देण्यात येणार आहे. (maharashtra govenrment approval for naming aurangabad and usmanabad sambhajinagar and dharashiv in state cabinet meeting)
मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार, आता औरंगाबाद हे शहर संभाजीनगर म्हणून ओळखलं जाणार आहे. तर उस्मानाबादला धाराशीव अशी नवी ओळख मिळणार आहे. तर नवी मुंबईतील प्रस्तावित विमानतळाला दि बा पाटील यांचंच नाव देण्यात येणार आहे.
-औरंगाबाद शहराच्या "संभाजीनगर" नामकरणास मान्यता.
-उस्मानाबाद शहराच्या “धाराशीव" नामकरणास मान्यता.
-नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे लोकनेते स्वर्गीय दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ या नामकरणास मान्यता.
-राज्यासाठी हळद संशोधन व प्रक्रिया धोरण लागू करणार. हिंगोली जिल्ह्यात मा. बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्र स्थापन करणार.
- कर्जत (जि. अहमदनगर) येथे दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) न्यायालय स्थापन करणार
- अहमदनगर - बीड - परळी वैजनाथ या नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाच्या सुधारित खर्चास मान्यता व त्यासाठी राज्य शासनाचा हिस्सा देणार
- ग्रामीण भागातील विशेष मागास प्रवर्ग आणि इतर मागास प्रवर्गासाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले घरकुल योजना राबवणार.
- विदर्भ विकास मंडळ, मराठवाडा विकास मंडळ व उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळ ही विकास मंडळे पुनर्गठीत करण्याचा निर्णय.
- निवड झालेल्या परंतु मराठा आरक्षण रद्द झाल्याने नियुक्ती न मिळालेल्या एसईबीसी उमेदवारांकरिता अधिसंख्य पदे निर्माण करण्यासाठी विधेयक मांडण्याचा निर्णय
- शासन अधिसुचना ८ मार्च २०१९ अनुसार आकारावयाच्या अधिमुल्याची रक्कम भरण्याच्या कालावधीस मुदतवाढ देण्याचा निर्णय.