दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिफारस केलेल्या मंत्रिमंडळाच्या खातेवाटपास राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मान्यता दिली आहे. रविवारी सकाळी स्वाक्षरी करून या खातेवाटपाला मंजुरी दिली आहे. ट्विटरच्या माध्यमातून राज्यपालांनी याची माहिती दिली आहे. यानंतर राज्यमंत्र्यांच्या खातेवाटपाटाची पहिली यादी झी चोवीस तासच्या हाती लागली आहे.
शिवसेनेची यादी
अब्दुल नबी सत्तार - महसूल, ग्रामविकास, बंदरे, खार जमिनी विकास, विशेष सहाय्य
शंभुराज शिवाजीराव देसाई - गृह (ग्रामीण), वित्त, नियोजन, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास व उद्योजकता, पणन
शंभुराज देसाई यांच्याकडे गृहराज्यमंत्रीपद देण्यात आलं आहे. महत्वाचं म्हणजे शंभुराज देसाई यांचे आजोबा लोकनेते बाळासाहेेब देसाई यांनी देखील खात्याची जबाबदारी या अगोदर सांभाळली आहे. 'कणखर गृहमंत्री' म्हणून त्यांची ओळख होती. हा वारसा शंभुराज देसाई पुढे चालवणार का? याकडे लक्ष राहील. (ठाकरे सरकारच्या खाते वाटपाची अंतिम यादी राज्यपालांकडे, स्वाक्षरी बाकी)
राष्ट्रवादी काँग्रेसची यादी
दत्तात्रय विठोबा भरणे - सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), मृद व जलसंधारण, वने, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय, सामान्य प्रशासन
संजय बाबुराव बनसोडे - पर्यावरण, पाणी पुरवठा व स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), रोजगार हमी, भूकंप पुनर्वसन, संसदीय कार्य
प्राजक्त प्रसादराव तनपुरे - नगर विकास, उर्जा, आदिवासी विकास, उच्च व तंत्र शिक्षण, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन
अदिती सुनिल तटकरे - उद्योग, खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रिडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क
काँग्रेसची यादी
सतेज उर्फ बंटी डी. पाटील - गृह (शहरे), गृहनिर्माण, परिवहन, माहिती तंत्रज्ञान, संसदीय कार्य, माजी सैनिक कल्याण
डॉ. विश्वजीत पतंगराव कदम - सहकार, कृषी, सामाजिक न्याय, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अल्पसंख्यांक विकास व औकाफ, मराठी भाषा
अपक्ष
ओमप्रकाश उर्फ बच्चू बाबाराव कडू - जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार
राजेंद्र श्यामगोंडा पाटील यड्रावकर - सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, वैद्यकीय शिक्षण, अन्न व औषध प्रशासन, वस्त्रोद्योग, सांस्कृतिक कार्य
उद्धव बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री - सामान्य प्रशासन, माहिती तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, विधी व न्याय, व इतर कोणत्याही मंत्र्यांना नेमुन न दिलेले विषय/खाती
सुभाष राजाराम देसाई - उद्योग, खनिकर्म, मराठी भाषा
एकनाथ संभाजी शिंदे - नगर विकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम)
उदय रविंद्र सामंत - उच्च व तंत्र शिक्षण
दादाजी दगडू भुसे - कृषि, माजी सैनिक कल्याण
संजय दुलिचंद राठोड - वने, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन
गुलाबराव रघुनाथ पाटील - पाणी पुरवठा व स्वच्छता
संदिपानराव आसाराम भुमरे - रोजगार हमी, फलोत्पादन
ॲड. अनिल दत्तात्रय परब - परिवहन, संसदीय कार्य
शंकराराव यशवंतराव गडाख - मृद व जलसंधारण
आदित्य उद्धव ठाकरे - पर्यटन, पर्यावरण, राजशिष्टाचार
अजित अनंतराव पवार - उप मुख्यमंत्री, वित्त, नियोजन
छगन चंद्रकांत भुजबळ - अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण
दिलीप दत्तात्रय वळसे- पाटील - कामगार, राज्य उत्पादन शुल्क
जयंत राजाराम पाटील - जलसंपदा व लाभक्षेत्र विकास
नवाब मोहम्मद इस्लाम मलिक - अल्पसंख्याक विकास व औकाफ, कौशल्य विकास व उद्योजकता
अनिल वसंतराव देशमुख - गृह
राजेंद्र भास्करराव शिंगणे - अन्न व औषध प्रशासन
राजेश अंकुशराव टोपे - सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण
हसन मियालाल मुश्रीफ - ग्राम विकास
डॉ.जितेंद्र सतिश आव्हाड - गृहनिर्माण
ॲड. के.सी. पाडवी - आदिवासी विकास
बाळासाहेब उर्फ श्यामराव पांडुरंग पाटील - सहकार, पणन
धनंजय पंडितराव मुंडे - सामाजिक न्याय व विशेष सहाय्य
अशोक शंकरराव चव्हाण - सार्वजनिक बांधकाम(सार्वजनिक उपक्रम वगळून)
विजय उर्फ बाळासाहेब भाऊसाहेब थोरात - महसूल
डॉ.नितीन काशिनाथ राऊत - उर्जा
वर्षा एकनाथ गायकवाड - शालेय शिक्षण
सुनिल छत्रपाल केदार - पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण
विजय वडेट्टीवार - इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, खार जमिनी विकास, भुकंप पुनर्वसन
अमित विलासराव देशमुख - वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्य
अस्लम रमजान अली शेख - वस्त्रोद्योग, मत्स्य व्यवसाय, बंदरे विकास
ॲड. यशोमती ठाकूर (सोनवने) - महिला व बालविकास