मुंबई : राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा आलेख ओसरत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण विभागानं (Maharashtra Education Department) राज्यातील कोरोनामुक्त भागातील 8 वी ते 12 वीचे वर्ग सुरु करण्याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र शासनानं याबाबत एक शासन निर्णय जारी केला आहे. ग्रामीण भागात कोरोनामुक्त गावातील ग्रामपंचायतीनं त्यांच्या अखत्यारीत असणाऱ्या गावातील इयत्ता 8 वी ते इयत्ता 12 वीचे वर्ग सुरु करण्याबाबत पालकांशी चर्चा करुन ठराव करावा, असं यात नमुद करण्यात आलं आहे.
- शाळेत विद्यार्थ्यांना टप्याटप्याने बोलवण्यात येणार
- कोविड संबंधी नियमांचे पालन करावे लागणार
- एक बाकावर एक विद्यार्थी बसवता येणार दोन बाकांमध्ये सहा फूट अंतर
- एका वर्गात जास्तीत जास्त 15 ते 20 विद्यार्थी
- सतत हात साबणाने धुणे,मास्क घालणे हे नियम पाळवे लागणार
- कोणतीही लक्षण आढळल्यास विद्यार्थ्यांना घरी पाठवणार
- लगेच कोरोना चाचणी करावी लागणार
- संबंधित शाळेतील शिक्षकांची राहण्याची व्यवस्था त्याच गावात करावी किंवा त्यांना सार्वजनिक वाहतूक व्यवस्था न वापरण्याची दक्षता घ्यावी
- एखाद्या शाळेत क्वारंटाईन सेंटर असल्यास स्थानिक प्रशासनाने ते इतर ठिकाणी स्थानापन्न करावे
- स्थानिक प्रशासनाने अशा शाळेचे हस्तांतरण शाळा व्यवस्थापनाकडे करण्यापूर्वी त्याचे पूर्णत: निर्जंतुकीकरण करावे.
कोरोना संबंधी सर्व आवश्यक ती खबरदारी घेण्यात यावी. शासनानं जारी केलेल्या कार्यपद्धतीचं काटेकोरपणानं पालन करावं, असं शासन निर्णयात सांगण्यात आलं आहे.