मुंबई : राज्यात कोरोनाचा कहर (Maharashtra Corona Update) सातत्याने कायम आहे. राज्यात गुरुवारच्या तुलनेत आज (17 जून) 90 रुग्ण कमी सापडलेत. मात्र, असं असलं तरी आरोग्य विभागाची चिंता कायम आहे. राज्यात आज एकूण 4 हजार 165 जणांना कोरोना रुग्णांचं निदान झालं आहे. तर गुरुवारी 4 हजार 255 जण पॉझिटिव्ह सापडले होते. (maharashtra corona update 17 june 2022 today 4 thousand 165 patients found in state know positivity rate and active patints)
कोरोनामुळे राज्यात दिवसभरात 3 जणांचा मृत्यू झाला आहे. तर सक्रीय रुग्णांचा आकडा हा 21 हजारांच्या वर गेला आहे. राज्यात ताज्या आकडेवारीनुसार 21 हजार 749 एक्टीव्ह रुग्ण आहेत. या रुग्णांवर आरोग्य यंत्रणा लक्ष ठेवून आहे.
राज्यातील रुग्णांपैकी सर्वाधिक पॉझिटिव्ह हे मुंबईतील आहेत. मुंबईतील रुग्णवाढ ही कायम आहे. मुंबईला कोरोनाचा सर्वाधिक धोका आहे. मुंबईत गेल्या 24 तासांमध्ये 2 हजार 255 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.
शुक्रवार 17 जून : 4 हजार 165
गुरुवार 16 जून : 4 हजार 255
बुधवार 15 जून : 4 हजार 24
मंगळवार 14 जून : 2 हजार 956
सोमवार 13 जून : 1 हजार 885
रविवार 12 जून : 2 हजार 946
शनिवार 11 जून : 2 हजार 922
शुक्रवार 10 जून : 3 हजार 81
गुरुवार 9 जून : 2 हजार 813
बुधवार 8 जून : 2 हजार 701
मंगळवार 7 जून : 1 हजार 881
सोमवार 6 जून : 1 हजार 36
रविवार 5 जून : 1 हजार 494
शनिवार 4 जून : 1 हजार 357
शुक्रवार 3 जून : 1 हजार 134
गुरुवार 2 जून : 1 हजार 45
बुधवार 1 जून : 1 हजार 81
Maharashtra reports 4,165 fresh Covid19 cases today; Active cases at 21,749 pic.twitter.com/D2caB4krBv
— ANI (@ANI) June 17, 2022