कोरोना पॉझिटिव्ह चोर कोव्हिड सेंन्टरमधून पळाला, आणि पोलिसांना चोराच्या बायकोचा फोन आला...

महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईच्या कांदिवली पोलिसांच्या पथकाने वांद्रेपासून बोरीवलीपर्यंत डझनभर मेडिकल स्टोअरमध्ये चोरी केल्याबद्दल एका युवकाला अटक केली आहे.

Updated: May 2, 2021, 03:56 PM IST
कोरोना पॉझिटिव्ह चोर कोव्हिड सेंन्टरमधून पळाला, आणि पोलिसांना चोराच्या बायकोचा फोन आला... title=

कांदिवली : महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईच्या कांदिवली पोलिसांच्या पथकाने वांद्रेपासून बोरीवलीपर्यंत डझनभर मेडिकल स्टोअरमध्ये चोरी केल्याबद्दल एका युवकाला अटक केली आहे. त्याआरोपीला कोरोना झाला होता म्हणून त्याला कोव्हिड सेंन्टरमध्ये ठेवण्यात आले होते. परंतु तो तेथून पळुन गेला आणि घरी पोहोचला तेव्हा त्याच्या पत्नीने पोलिसांना याबद्दलची माहिती दिली. या दरम्यान पोलिसांनी आरोपीला अटक केले आहे.

हे प्रकरण कांदिवली पोलिस स्टेशन क्षेत्रातील आहे. जेथे एक आरोपी करीम सबुला खान उर्फ पाव, हा अनेक मेडिकल स्टोअरमध्ये चोरीच्या आरोपाखाली कांदिवली पश्चिम येथील साई नगरमधील क्वारंटिन सेंटरमध्ये ठेवण्यात आले. आरोपीला अटक झाल्यानंतर वैद्यकीय तपासणीनंतर पोलिसांना तो कोरोना पॉझिटिव्ह आढळला. त्यानंतर तो क्वारंटाईन केंद्राची खिडकी कापून फरार झाला होता. त्याचा शोध घेण्याचा पोलिस प्रयास करत होते.

कांदिवली पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाबासाहेब साळुंखे यांनी सांगितले की, आरोपी करीम याला क्वारंटिन सेंटरमधून फरार झाल्यानंतर आम्ही त्याच्या पत्नीशी संपर्क साधला आणि करीमच्या कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्टविषयी तिला माहिती दिली. यावेळी आरोपी करीम घरी परत आला असेल तर पोलिसांना कळवावे, असे तिला सांगण्यात आले.

अशा परिस्थितीत करीम घरी पोहोचताच त्याच्या पत्नीने फोन करून त्याविषयीची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिस पथकाने त्याला घरून अटक केली. इंस्पेक्टर सांगितले की, करीमला अटक केल्यानंतर  त्याला पीपीई किटमध्ये क्वारंटिन सेंटरवर परत आणले आहे. येथे आरोपी बरा झाल्यानंतर त्याला न्यायालयात हजर केले जाईल.

मृतांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे

कोरोना विषाणूच्या साथीमुळे देशभरात संतापाचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत शनिवारी राज्यात कोरोना संक्रमणामुळे 802 हून अधिक मृत्यूची नोंद झाली आहे. त्याचबरोबर नागपूर शहरात मृतांचा आकडा अजूनही कायम आहे. शनिवारी नागपुरातही मृतांची संख्या 99 झाली, ही चांगली बातमी नाही.

कोणत्याही शहरासाठी मृतांची इतकी संख्या भयानक आहे. एवढेच नव्हे तर मुंबईत मृतांच्या आकड्यातही झपाट्याने वाढ झाली आहे. शनिवारी मुंबईत कोरोना संसर्गामुळे 90 जणांचा मृत्यू झाला. तर पुण्यात 67 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्याचा मृत्यू दर 1.49 आहे आणि रीकव्हरी रेट 84.24 टक्के आहे.