वादात अडकलेल्या संजय राठोड यांना पुन्हा मंत्रीपद, चित्रा वाघ म्हणतात 'लडेंगे….जितेंगे'

संजय राठोड यांना शिंदे-फडणवीस गटाकडून क्लीन चिट आणि मंत्रीपदही

Updated: Aug 9, 2022, 12:16 PM IST
वादात अडकलेल्या संजय राठोड यांना पुन्हा मंत्रीपद, चित्रा वाघ म्हणतात 'लडेंगे….जितेंगे' title=

मुंबई :  राज्यातील शिंदे-फडणवीस (Shinde-Fadanvis Government) मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. पहिल्या टप्प्यात 18 आमदारांना शपथ घेतली.  राजभवनात शपथविधी सोहळा पार पडला. 

दरम्यान, या मंत्रिमंडळात वादग्रस्त आमदार संजय राठोड (Sanjay Rathod) यांचा समावेश करण्यात आला आहे. पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्याप्रकरणात संजय राठोड यांच्यावर आरोप झाले होते. त्यानंतर ठाकरे सरकारमध्ये असताना संजय राठोड यांना वनमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. 

भाजपने या विरोधात जोरदार आवाजही उठवला होता. पण हे सर्व बाजूला सारुन शिंदे सरकारमध्य संजय राठोड यांना संधी देण्यात आली आहे. संजय राठोड यांच्या मंत्रिमंडळातील समावेशावरुन भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी ट्विट करत हे दुर्देवी असल्याचं म्हटलं आहे. 

चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय, 'संजय राठोड जरी पुन्हा मंत्री झालेला असला तरीही त्याच्या विरुद्धचा माझा लढा मी सुरूचं ठेवलेला आहे माझा न्याय देवतेवर विश्वास लडेंगे….जितेंगे'

एकनाथ शिंदे यांच्या पाठिशी
एकनाथ शिंदे (CM Ekant Shinde) यांनी बंड पुकारल्यानंतर सुरुवातीपासूनच संजय राठोड यांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला होता. त्याचं फळ संजय राठोड यांना मिळालं आहे. मंत्रिमंडळ विस्ताराला अवघे काही मिनिटं शिल्लक असताना राठोड यांना मंत्रिपदासाठी बोलावण्यात आलं. संजय राठोठ यांना बंजारा समाजात मानणारा मोठा वर्ग आहे. त्यांना संजय राठोड यांचा शिंदे फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपद पक्क मानलं जात होतं.