महामानवाचा गौरव करणारी सुपरहिट गाणी

 ही गाणी प्रत्येक वेळी उत्साह, प्रेरणा, नवचैतन्य देणारी ठरतात. 

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Dec 6, 2017, 09:56 AM IST
  महामानवाचा गौरव करणारी सुपरहिट गाणी title=

मुंबई : भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६ डिसेंबर हा स्मृतिदिन. महामानवाचा महापरिनिर्वाण दिन. या महामानवाच्या कार्याचा, जीवनाचा गौरव करणारी अनेक गाणी आज ऐकायला मिळतात. 

भीमाची थोरवी

पण मिलींद शिंदे, आनंद शिंदे, प्रल्हाद शिंदे यांच्या आवाजातील भीमगीते ऐकणे ही पर्वणीच म्हणावी लागले. यांच्या गाण्याची शैली, पहाडी आवाजातील गाणी लाखो अनुयायांच्या तोंडपाठ आहेत. ही गाणी प्रत्येक वेळी उत्साह, प्रेरणा, नवचैतन्य देणारी ठरतात. 

 
दलितांना, वंचितांना त्यांचे न्याय, हक्क मिळवून देणाऱ्या बाबासाहेबांचं संपूर्ण आयुष्यच प्रेरणादायी आहे.

त्यांचा प्रत्येक विचार हा स्वतंत्र अभ्यासाचा विषय ठरतो.

.

अशा कित्येक विचारांवर या पिढीतले असंख्यजण अभ्यास करत आहेत. 

 
 देशभरातून आज लाखोंचा जनसागर बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी दादरच्या चैत्यभूमीवर लोटलाय.