मुंबई : मविआ एकत्र लढणार आणि महापालिका निवडणूक जिंकणार, असे संकेत तीनही पक्षाच्या नेत्यांनी दिले आहेत. भाजपला रोखण्यासाठी जे शक्य ते सगळं करु, असं बाळासाहेब थोरात म्हणाले आहेत. एकत्र लढलो तर महाविकास आघाडीला हरवणं कठीण होईल असं राऊतांनी म्हटलं आहे. राष्ट्रवादीनंही एकत्र लढण्याचे संकेत दिले आहेत.
सत्ताबदलात "महाआघाडी'चा चमत्कार झाल्यावर येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही तोच फॉर्म्युला लागू करण्यासाठी स्थानिक राजकारण सक्रिय झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला भिडण्यासाठी एकीचा प्लान आखलाय. मिशन इलेकशनसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व मंत्री व खासदारांची बैठक झाली.
स्थानिक पातळीवर महाविकास आघाडी निवडणुकांसाठी एकत्र कसे येईल अशीही चर्चा बैठकीत झाली. पंरतू काँग्रेस-शिवसेना काय करणार? हा मोठा प्रश्न महाविकास आघाडीत आहे. कारण स्थानिक पातळीवर काँग्रेस आणि शिवसेना एकत्र निवडणूक लढवणार याबाबत जून चित्र स्पष्ट नाही.
1- स्थानिक पातळीवर महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढवावी
2- तीन पक्षांचे झेंडे वेगळे असले, तरी अजेंडा मात्र एकच' असल्याने एकत्र निवडणू लढवण्याचा प्लान. त्यासाठी स्थानिक नेत्यांशी बोलून जागा वाटप करायचे.
3- महाराष्ट्रातील मुंबई-पुणे-नाशिक हा ट्रँगल 100 विधानसभा जागांचा आहे. आगामी निवडणुकीसाठी या जागा खूप महत्त्वाच्या ठरतात. 2014 च्या निवडणुकीत हा अर्बन व्होटर भाजपकडे गेला होता. यासाठी तिन्ही पक्षांनी मिळून एकत्र येऊन निवडणूक लढवली तर फायदा होण्याची आपेक्षा
आगामी महापालिका निवडणुका तिन्ही पक्षांनी एकत्र लढवल्या तर महाविकास आघाडीला फायदा होईल की तोटा याबाबत ही प्रश्न आहे. मुळात महाविकास आघाडी ही गेल्यावर्षी निवडणुकीनंतर सत्ता समीकरणांच्या जुळवा-जुळवीत तयार झाली होती. मतदारांनी त्यावेळी महाविकास आघाडी म्हणून या तिन्ही पक्षांना अर्थातच मत दिले नव्हते. त्यामुळे हे तिन्ही पक्ष एकत्रित आल्याचं मतदारांना मान्य आहे की नाही, याची निवडणुकीद्वारे चाचपणी पदवीधर आणि शिक्षक निवडणुकीच्या निमित्ताने पहिल्यांदाच झाली. यात महाविकास आघाडीच्या दृष्टीने सकारात्मक निकालही लागले. त्यानंतर भाजपने पुढच्या निवडणुकीचा प्लॅन त्यानुसार तयार करायला सुरुवात केलीये. त्यामुळे महापालिका निवडणुका एकत्र लढवल्यास महाविकास आघाडीला फायदा की तोटा? हा प्रश्न महत्वाचा आहे
महापालिका निवडणुका एकत्र लढवल्यास महाविकास आघाडीला फायदा की तोटा?
१- राज्याच्या पातळीवर ज्या आघाड्या-युत्या होतात, ते स्थानिक पातळीवर लढाया या वॉर्डनिहाय असते. शिवाय, स्थानिक स्वराज्य संस्थांनिहाय महाविकास आघाडीतील पक्षांचीही स्वतंत्र ताकद आहे. एकमेकांना सामावून घेण्यात अडचणी येण्याचीच शक्यात अधिक आहे.
२- महापालिका स्तरावर लोक पक्ष पाहून मतदान करत नाहीत. आपला प्रतिनिधी किती उपयोगी पडला आहे किंवा पडू शकतो, हे पाहून मतदान करतो
3- बंडखोऱ्या वाढण्याची शक्यता आहे "एकाच पक्षाचे मुळात चार-पाच जण तयारी करत असतात. मग तिन्ही पक्षांचे चार-चार पकडले, तर त्यातून एक उमेदवार निवडणं प्रॅक्टिकली शक्य नाही."
राज्यात 4 महिन्यांत 30 नवे पक्ष
लॉकडाऊनमध्ये राज्यात ४१ नवीन पक्षांनी जन्म घेतला आहे. राज्य निवडणूक आयोगाकडे नोंदलेल्या राजकीय पक्षांची संख्या ३१३ च्या घरात गेली असून त्यात "आघाडी' शब्दाचा समावेश असलेल्या ८५, तर "सेना' शब्दासह नोंदल्या गेलेल्या १३ पक्षांचा समावेश आहे. सत्ताबदलात "महाआघाडी'चा चमत्कार झाल्यावर येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही तोच फॉर्म्युला लागू करण्यासाठी स्थानिक राजकारण सक्रिय झाले आहे. अनोंदणीकृत पक्षाची संख्या ३३० वर पोहोचली आहे.