फेरीवाल्यांचा प्रश्न पालिकेचा - माधव भंडारी

फेरीवाल्यांचा प्रश्न हा त्या - त्या संबंधित महापालिकेचा आहे. महापालिकेने वेळेवर निर्णय घेतले नाहीत. त्यामुळे हा प्रश्न निर्माण झालं असून याला जबादार महापालिका आहेत, असं मत भाजप प्रवक्ते माधव भंडारी यांनी व्यक्त केलं.

Updated: Nov 2, 2017, 09:42 AM IST
फेरीवाल्यांचा प्रश्न पालिकेचा - माधव भंडारी title=

मुंबई : फेरीवाल्यांचा प्रश्न हा त्या - त्या संबंधित महापालिकेचा आहे. महापालिकेने वेळेवर निर्णय घेतले नाहीत. त्यामुळे हा प्रश्न निर्माण झालं असून याला जबादार महापालिका आहेत, असं मत भाजप प्रवक्ते माधव भंडारी यांनी व्यक्त केलं.

स्टेशन परिसरातून चालताना फेरीवाल्यांमुळे त्रास होत असेल तर आम्ही सर्वसामान्यांच्या बाजूने आहोत, असं मत भाजपाचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी म्हटलंय. काँग्रेस आणि मनसे आमने-सामने येऊन कायदा हातात घेत असतील तर ते चालणार नाही, असंही ते म्हणालेत.

काँग्रेस-मनसे कार्यकर्ते भिडले

बुधवारी, काँग्रेसने आयोजित केलेल्या फेरीवाल्यांच्या मोर्चाआधी दादरमध्ये मनसे आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमने-सामने आले. यावेळी दादरमध्ये काँग्रेसच्या मोर्चा आयोजकांची गाडीही फोडण्यात आलीय. या आंदोलनासाठी आधी स्टार मॉलपासून कबुतर खान्यापर्यंत मोर्चा काढायला पोलिसांनी परवानगी दिली होती. मात्र, अचानक मोर्चाचा मार्ग बदलण्यात आला होता.

११.०० वाजल्याच्या सुमारास काँग्रेस आयोजित मूक मोर्चासाठी अनेक फेरीवाले आणि काँग्रेस कार्यकर्ते नक्षत्र मॉलच्या परिसरात जमू लागले होते. त्याचवेळी मनसेचे कार्यकर्तेही मोर्चाला विरोध करण्यासाठी तिथे आले. दोन्ही बाजूनं जोरदार घोषणाबाजी सुरू झाली आणि कार्यकर्ते एकमेकांना भिडले. मोर्चाच्या वेळी अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा मोठा फौजफाटा परिसरात तैनात होताच. त्यामुळे दोन्ही बाजूनं आक्रमक असणाऱ्या कार्यकर्त्यांना रोखण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला. त्यानंतर मनसेच्या काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.