डिलाईल पुलाचा एक भाग खुला होण्याची शक्यता

लहान वाहनं आणि पादचाऱ्यांसाठी दिलासा

Updated: Jul 26, 2018, 12:46 PM IST
डिलाईल पुलाचा एक भाग खुला होण्याची शक्यता title=

मुंबई : पश्चिम रेल्वेच्या लोअर परळ स्टेशनजवळ डिलाईल पुलाचा काही भाग खुला होण्याची शक्यता आहे. लहान वाहनं आणि पादचाऱ्यांसाठी पुलाची एक बाजू खुली करण्यासाठी प्रशासनावर प्रवाशांचा वाढता दबाव आहे. आज पालिका अधिकारी आणि रेल्वेचे अधिकारी पुलाच्या स्थितीचा आढाव घेण्यासाठी पाहाणी दौरा करणार आहेत. मंगळवारी आयुक्तांनी रेल्वे अधिकारी आणि पालिका अधिकाऱ्यांची बैठकही घेतली.

स्थानिक लोकप्रतिनिधी, संबंधित रेल्वे अधिकारी, बृहन्मुंबई महापालिकेचे संबंधित अधिकारी,वाहतूक पोलीस व मुंबई पोलीस यांनी उद्या या पुलाची पाहणी करुन या पुलावरील कुठला भाग,कुठल्या प्रकारच्या वाहतूकीसाठी खुला करता येऊ शकतो, याचा निर्णय घ्यावा असे आदेश आयुक्तांनी यावेळी दिले आहेत.