आम्हाला 1 जागा द्यावी, मी शिर्डीसाठी इच्छुक; रामदास आठवलेंची अमित शहांकडे मागणी

Ramdas Aathavle:  लोकसभेत मी असावं, अशी कार्यकर्त्यांची भावना आहे. आता महायुती मला जागा देईल, असे 

Pravin Dabholkar | Updated: Feb 23, 2024, 10:51 PM IST
आम्हाला 1 जागा द्यावी, मी शिर्डीसाठी इच्छुक;  रामदास आठवलेंची अमित शहांकडे मागणी title=
Ramdas Aathavale

Ramdas Aathavle: रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रमुख रामदास आठवले हे शिर्डीतून लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. आपण यासंदर्भात  अमित शहा आणि जे पी नड्डा तसेच देवेंद्र फडणवीस यांनाही भेटलो आहे. असे ते म्हणाले. आम्हाला 1 जागा देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. लोकसभेत मी असावं, अशी कार्यकर्त्यांची भावना आहे. आता महायुती मला जागा देईल. मोदींसाठी सगळ्यांनी कामाला लागा, असे आवाहन त्यांनी केले. 

पंतप्रधान मोदींच्या 400 पार धोरणावर यावेळी त्यांनी भाष्य केले. मागच्या 5 वर्षाप्रमाणे पुढच्या 5 वर्षात देखील विकासाची काम करता येतील. तसेच महाराष्ट्रात 45 जागा मिळण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.

जातीमुक्त समाज रचना झाली पाहिजे… अखंड भारत राहिला पाहिजे, अशी भूमिका डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडली. गाडगेबाबा आणि बाबासाहेबांचे चांगले संबंध होते. समाज म्हणून आपण एकच आहोत… आपला देश एक म्हणजे आपण एक आरक्षण पाहिजे असेल तर घ्या. मिळाल असेल तर शांत बसा, असे आठवले म्हणाले. 

जरांगेंनी थांबायला हवं 

मनोज जरांगे पाटील यांच अभिनंदन.. मी त्यांना गावी भेटून आलोय.  त्यांनी सरकारला निर्णय घ्यायला भाग पाडलं पण लगेच अंमलबजावणी करा असं म्हणता येईल. आता आंदोलनाची आवश्यकता नाही. त्यांनी सरकारला पाठिंबा दिला पाहिजे. काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. त्यांच्या सोबतचे लोक त्याच्याविरोधात जात आहेत. आम्ही देखील आंदोलन केली आहेत. त्यांनी आता थांबावयास हवं, असे आवाहन त्यांनी जरांगेंना केले. 

आमच्या आरक्षणाला हात लावू नका 

आमच्या आरक्षणाला कोणी हात लावायला जाऊ नका.. आम्ही ते होऊ देणार नाही. मी गावातून आलोय. सगळा मराठा समाज श्रीमंत नाहीअनेकांना मुलांच शिक्षण घेता येत नाही… त्यांना नोकरी मिळत नाही, असे त्यांनी सांगितले. 

महार, दलिताचा पोराचा रोष त्यांच्या मनात होता. मंडल आयोगासाठी आम्ही आंदोलन केली. पूर्वी मागासवर्गीस म्हणून घ्यायला अनेक जण तयार नव्हते.  संविधानाने जाती व्यवस्था नष्ट केली आहे. जातीच्या आधारावर जनगणना करणार कशी? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. मी राहुल गांधी यांच्यासोबत असताना यासंदर्भात मागणी केली होती. तेव्हा कॉंग्रेस सरकारची अडचण होती.

आम्हाला 15 टक्के आरक्षण आहे. आता 2024 ची लोकसंख्या अधिक आहे… त्यामुळे आरक्षण वाढविण्याची आमची मागणी आहे. टक्केवारीनुसार आरक्षण देण्याची आमची मागणी असल्याचे ते म्हणाले. 

दक्षिण मध्य मध्ये पूर्वी मी निवडून आलोय… आता 2 वेळा राहुल शेवाळे तिथून निवडून आलेत. तिसर्यांदाही ते निवडून येतील, असे त्यांनी सांगितले. आता मोदींच्या शपथविधीत राहुल शेवाळे आणि माझाही शपथविधी होईल

मुंबईत अनेक ठिकाणी आमचे लावलेले कटआउट्स काढले. पालिकेने असा दुजाभाव करु नये. सरकार आपल आहे. पालिकादेखील आपलीच आहे. आपण पालिकेची तक्रार केली पाहिजे, असे ते म्हणाले. 

ठाकरेंसोबत चांगले संबंध 

माझे उद्धव ठाकरेंसोबतचे संबंध चांगले झाले पण एकनाथ शिंदे यांचे तेवढे राहिले नाहीत. उद्धव ठाकरे म्हणतात, मला भाजपाने शब्द दिला आणि तो पाळला नाही. भाजपावाले असाच शब्द देत नाहीत.. शब्द दिला तर ते पाळतात, असे आठवले म्हणाले. 

नितीश कुमार हे इंडिया आघाडीसोबत गेले होते पण शब्द दिल्यानुसार त्यांना पुन्हा सोबत घेतलं. भाजपावाले पक्ष संपवतात असा मला अनुभव नाही… माझा पक्ष वाढतोय… नागालॅंडमध्ये आमचे खासदार निवडून आलेत.. पुढच्या काळात आमचे सरकार येईल. माझे सगळ्यांशी संबंध चांगले आहेत. फक्त शरद पवारांशी नाहीत, असे ते म्हणाले. 

त्यांना तुतारीच वाजवायचीय

यावेळी त्यांनी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटावर टीका केली. त्यांना तुतारीच वाजवायची आहे. त्यांना आपले आमदार संभाळतां आले नाही. लोकांना तुतारी किती आवडेल, हे सांगता येत नाही. त्यांना फायदा होईल असं वाटत नाही, असे ते म्हणाले.