Loksabha 2024 : महायुतीकडून कल्याणमधील उमेदवारी जाहीर न केल्यानं संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि श्रीकांत शिंदेंवर (Shrikant Shinde) हल्लाबोल केलाय...कल्याणमधील उमेदवारी आधी शिंदेंनी जाहीर करावी. शिंदे ठाण्याचे तारणहार समजतात मग उमेदवारी का जाहीर केली नाहीस असा सवाल विचारत शिंदे दहशतीखाली असल्याचं म्हटलंय, तर दिल्ली अभी बहुत दूर है असं म्हणत राऊतांनी श्रीकांत शिंदेंचा उल्लेख बच्चू असा केलाय. तर एकनाथ शिंदे यांचा पक्ष काही दिवसच टिकेल असा दावा विरोधीपक्ष नेते अंबादास दानवेंनी (Ambadas Davne) केलाय. विधानसभेपर्यंत हा पक्ष राहील की नाही अशी शंकाही त्यांनी व्यक्त केलीये.
महायुतीत 10 जागांवर तिढा
महायुतीतील 10 जागांचा तिढा कायम आहे. मुंबईतील तीन जागांवर उमेदवार अजूनही जाहीर झालेला नाही. तर रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नाशिक, ठाणे, संभाजीनगरच्या जागेवर भाजप शिवसेनेनं दावा केलाय. सातारा, धाराशिवच्या जागेचाही महायुतीत तिढा कायम आहे.
देवेंद्र फडणवीस यांची सभा
महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवारी इंदापुरात जाहीर सभा घेणारेत. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात भाजप कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शनासाठी जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलंय. भाजप नेते हर्षवर्धन पाटलांना इंदापूर विधानसभेची उमेदवारी मिळावी अन्यथा आम्ही लोकसभेला काम करणार नाही अशी मागणी अंकिता पाटील ठाकरे आणि राजवर्धन पाटील यांनी केली होती. त्यासंदर्भात हर्षवर्धन पाटील आणि फडणवीसांमध्ये चर्चाही झाली होती. त्याचवेळी त्यांनी इंदापुरात येऊन कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यानुसार फडणवीस इंदापूर दौऱ्यावर जाणार आहेत. फडणवीस यावेळी नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.
यवतमाळमध्ये उमेदवार बदलला
वतमाळ-वाशिममध्ये भावना गवळींऐवजी राजश्री पाटलांना उमेदवारी देण्यात आलीय. आज त्या आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यावेळी उपस्थित असणारेत. गेले काही दिवस यवतमाळ-वाशिममधल्या उमदेवारीबाबत तिढा निर्माण झाला होता. भावना गवळींच्या नावाला भाजपचा तीव्र विरोध होता. त्यानंतर कुणाला उमेदवारी मिळणार असा प्रश्न निर्माण झाला होता मात्र राजश्री पाटील यांच्या नावानं आता त्यावर पडदा पडलाय.
तर हिंगोली लोकसभा मतदारसंघात महायुतीत बंडखोरी झालीय. भाजपचे रामदास पाटील आणि शिवाजी जाधव या दोन पदाधिकाऱ्यांनी कोहळीकरांविरोधात उमेदवारी अर्ज भरलाय. हिंगोलीत शिवसेनेकडून बाबुराव कोहळीकरांना उमेदवारी देण्यात आलीय. मात्र, शिवसेनेला जागा सुटल्याने भाजपचे दोन्ही नेते नाराज आहेत. भाजपच्याच नेत्यांनी अर्ज दाखल केल्याने हिंगोली मतदारसंघात कोहळीकरांची डोकेदुखी वाढणार आहे.