मुंबई : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालेय. त्यामुळे २० ते २५ मिनिटांनी गाड्या उशिराने धावत आहेत. याचा फटका प्रवाशांना ऐन भाऊबीजेच्या दिवशी बसत आहे.
वांगणी येथे रेल्वे रुळाला तडा गेल्याने कर्जतकडे जाणारी लोकल २० ते २५ मिनिटे उशिराने आहे. पहिली लोकल कर्जतसाठी रवाना झालेय. मात्र, दुरुस्तीचे काम मात्र सुरु असून लोकल वाहतूक धीम्या गतीने आहे. रेल्वेला गर्दी मात्र कायम असल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत.
वांगणी-शेलू रेल्वे स्थानका दरम्यान रेल्वे रुळाला तडे गेल्याने मध्य रेल्वेची कर्जत, पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. सकाळी ९.४५ वाजण्याच्या सुमारास रेल्वे रुळाला तडे गेल्याचे लक्षात आले. सध्या बदलापूरपर्यंत लोकल वाहतूक सुरु आहे. त्यापुढे कर्जत आणि पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक कोलमडली ठप्प आहे. मात्र, कर्जतला एक लोकल रवाना झाली.
लांब पल्ल्यांच्या गाडयांना याचा फटका बसला आहे. पुणे मार्गे पुढे जाणाऱ्यांचे हाल होत आहेत. कल्याणच्या पुढे मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडल्यामुळे प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. ऐन दिवाळीतही रेल्वेच्या गलथान कारभाराचा फटका प्रवाशांना बसत आहे. सुटी असल्याने गर्दी कमी असली तरी भाऊबीजेला गर्दी झालेय.