मुंबई : बॉक इंडिया जी कंपनी इंडस्ट्रीयल वर्कसाठी ऑक्सिजनसारख्या गॅसेस बनवण्याचं काम करते. या बेल्लारी ऑक्सिजन कंपनी प्रायव्हेट लिमिटेडचे शेअर्स एका वर्षात अडीच पटीवर गेले आहेत. ही कंपनी बॉक या नावाने शेअर मार्केटला लिस्टेड नाहीय. ही कंपनी वैद्यकीय क्षेत्रासाठी देखील ऑक्सिजन बनवते आणि पुरवते. भारतात कोरोनाची साथ येण्याआधी या कंपनीचे शेअर्स साधारण ७०० रूपयांच्या आसपास होते. ते शेअर्स पहिली लाट संपल्यानंतर १२०० रूपयांच्या जवळपास आले होते. ही किंमत अगदी सहा महिन्याच्या आत वाढली. तेव्हा या कंपनीच्या शेअर्सवर इन्ट्रा डे खेळता येत होतं.
यानंतर दुसरी लाट सुरु झाली, आणि त्या आधी या कंपनीकडून शेअर्स इन्ट्रा डेसाठी बंद करण्यात आले. पण यातही या कंपनीचे शेअर्स १६०० ते १७०० रूपये प्रति शेअर्सचा टप्पा पार करुन गेले. ही कंपनी शेअर मार्केटला Linde India Ltd नावाने लिस्टेड आहे. गुंतवणूकदारांसाठी ही चांगली संधी म्हणता येईल, फक्त कोरोनाची साथ मंदावल्यानंतर योग्य निर्णय घेणे देखील शेअर धारकावर अवलंबून आहे. मुंबईत परराज्यातून रेल्वेने ऑक्सिजन मागवला जात आहे, त्या रेल्वेवरील टँकरच्या सिलिंडरवर देखील Linde India चा लोगो आहे.
या कंपन्यांकडून येणारा ऑक्सिजन हा सुरुवातीला लिक्विड स्वरुपात येतो, त्यानंतर त्याचं रुपांतर वायूच्या स्वरुपात होतं, काही लोकांनी यासाठी स्थानिक ठिकाणी देखील प्रोजेक्ट उभे केलेले आहेत. त्या प्रोजेक्टसवर आज ऑक्सिजन घेण्यासाठी रांग लागली आहे.