मुंबई : मराठी राजभाषा दिनानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विट केलं आहे. तर सोबत एक पत्रही लिहीलं आहे. भाषा मरता देशही मरतो संस्कृतिचाही दिवा विझे...'. कुसुमाग्रजांना स्मरून 'मराठी भाषा दिना'निमित्त महाराष्ट्राला विनम्र आवाहन. असं ट्विट त्यांनी केलं आहे.
कुसुमाग्रजांचा जन्मदिवस, २७ फेब्रुवारी आपण सारे जण 'मराठी राजभाषा दिन' म्हणून साजरा करतो. सरकारी कॅलेंडरमधले अनेक दिवस निरसपणे साजरे होतात, तसाच हा दिवसही व्हायचा. पण मनसेनं हा दिवस मोठ्या उत्साहानं साजरा करायला सुरुवात केली. तेव्हापासून मराठी भाषेचा गौरव करणारा दिवस सर्वांच्या स्मरणात राहू लागला. आणि अर्थातच ह्या गोष्टीचा अभिमान आहे, असं त्यांनी पत्रात म्हटलं आहे.
'भाषा मरता देशही मरतो संस्कृतिचाही दिवा विझे...' कुसुमाग्रजांना स्मरून 'मराठी भाषा दिनाच्या' पूर्वसंध्येला महाराष्ट्राला विनम्र आवाहन.#मराठीराजभाषादिन #मायमराठी #महाराष्ट्रधर्म pic.twitter.com/CsRPkt2Yhp
— Raj Thackeray (@RajThackeray) February 26, 2021
तसेच स्वातंत्रवीर विनायक दामोदर सावरकर यांची आज पुण्यतिथी. यानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विटरच्या माध्यमातून आदरांजली वाहिली. यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर हे क्रांतिकारक, ज्वलंत साहित्यिक, हिंदू संघटक होतेच पण कमालीचे विज्ञाननिष्ठ आणि क्रियाशील धर्मसुधारक आणि समाजसुधारक देखील असल्याचं राज ठाकरेंनी ट्विटमध्ये म्हंटलं आहे. त्याचसोबत स्वातंत्र्य आणि सुराज्यासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या स्वातंत्र्यवीराच्या स्मृतीस मनसेचं अभिवादन असं ट्विट राज ठाकरे यांनी केलं आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर हे क्रांतिकारक, ज्वलंत साहित्यिक, हिंदू संघटक होतेच पण कमालीचे विज्ञाननिष्ठ आणि क्रियाशील धर्मसुधारक आणि समाजसुधारक देखील होते. स्वातंत्र्य आणि सुराज्यासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या स्वातंत्र्यवीराच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं अभिवादन pic.twitter.com/oGTpCyKGyx
— Raj Thackeray (@RajThackeray) February 26, 2021