मुंबई : दिग्गज ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांच्या प्रकृतीबाबत (lata mangeshkar health update) मोठी बातमी समोर येत आहे. लता दीदी यांची प्रकृती स्थिर नसल्याची माहिती काही वेळापूर्वी समोर आली होती. मात्र त्या आता उपचारांना प्रतिसाद देत आहेत, अशी माहिती लता दीदींवर उपचार करणाऱ्याना डॉक्टरांनी दिली आहे. यामुळे संपूर्ण देशवासियांना मोठा दिलासा मिळाला आहे. लता दिदी यांच्यावर मुंबईतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. (lata mangeshkar health update legendary singer lata mangeshkar Are give responding to treatment at mumbai private hospital)
दीदींची आज सकाळी तब्येत अचानक खालावली. दीदींना श्वसनाचा त्रास जाणवत होता. त्यामुळे त्यांना आयसीयूमधून व्हेंटिलेटरवर ठेवलं गेलं. यामुळं देशवासियांच्या काळजाचा ठोका चुकला.
मात्र काही तासांनंतर प्रकृतीबाबत दिलासादायक बातमी समोर आली. दीदींवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी पत्रकार परिषद घेतली. या दरम्यान त्यांनी दीदी उपचारांना प्रतिसाद देत असल्याची माहिती त्यांनी दिली.
दरम्यान दीदींच्या तब्येतीची माहिती घेण्यासाठी मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी रुग्णालयाच्या दिशेने धाव घेतली. तिथे त्यांनी डॉक्टरांशी आणि दीदींच्या नातेवाईकांसह तब्येतीची विचारपूस केली. राज ठाकरे तासाभरापेक्षा जास्त वेळ रुग्णालयात थांबून होते.
दरम्यान, वैद्यकीय पथक 24 तास लता दीदी यांच्यावर लक्ष ठेवून आहेत. दीदींची प्रकृती स्थिर व्हावी, त्या ठणठणीत होऊन घरी परताव्यात यासाठी संपूर्ण देशातून प्रार्थना करण्यात येत आहेत.