चालत्या ट्रेनमध्ये महिला कॉन्स्टेबलची छेडछाड, नशेतील युवकाला फटकावलं

रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा तरुण ट्रेनच्या गेटवर उभा राहून नशा करत होता. 

Updated: Jul 15, 2021, 11:35 AM IST
चालत्या ट्रेनमध्ये महिला कॉन्स्टेबलची छेडछाड, नशेतील युवकाला फटकावलं title=

मुंबई : चालत्या ट्रेनमध्ये महिला कॉन्स्टेबलची छेडछाड केल्याचा प्रकार समोर आला आहे. नशेत असलेल्या तरुणाने महिला कॉन्स्टेबलला उलट-सुलट बोलत वाद घालायला  सुरुवात केली. या तरुणाला त्याच्या कृत्यासाठी काठीचे चांगलेच फटके पडले आहेत. ही घटना 10 जुलै रोजी वडाळा रेल्वे स्थानकावर घडली. 

रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा तरुण ट्रेनच्या गेटवर उभा राहून नशा करत होता. तरुणाला नशा करताना पाहून महिला कॉन्स्टेबलने त्याला ट्रेनमधून खाली  उतरण्यास सांगितलं. पण हा तरुण ऐकायला तयार नव्हता.

ट्रेन चालू होणार तरीही हा तरुण खाली उतरायला तयार नव्हता, अखेर यावरुन महिला कॉन्स्टेबल आणि तरुणामध्ये वाद सुरु झाला. त्यानंतर या युवकाने महिला  कॉन्स्टेबलला उलट-सुलट बोलायला सुरुवात केली. चालत्या ट्रेनमध्ये या नशेडी युवकाने महिला कॉन्स्टेबलला छेडछाड केली. या युवकाला सरळ करण्यासाठी अखेर महिला  कॉन्स्टेबलने काठीने त्याला चोप दिला.

अखेर वडाळा रेल्वे पोलिसांनी महाराष्ट्र पोलिस कायद्यानुसार या नशेत धुंद असलेल्या युवकावर गुन्हा दाखल केला आहे. 
वडाळा रेल्वे पोलिस या युवकावर पुढील कारवाई  करत आहेत. त्यामुळे युवकाला महिला कॉन्स्टेबलसोबत अशाप्रकारे गैरवर्तन करणं महागत पडल्याचं दिसून आलं.