मुंबई : सर्वसामान्यांना चटके देणाऱ्या इंधन दरवाढीसंदर्भातली बातमी समोर येतेय. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आठवडाभरात चौथ्यांदा वाढ करण्यात आलीये. या महिन्यात पेट्रोल डिझेलचे भाव 20वेळा वाढलेत. पेट्रोल-डिझेलच्या दरात शनिवारी लिटरमागे 25 पैशांनी वाढ झालीये.. त्यामुळे मुंबईत पेट्रोलचा दर 92.28 रुपये लिटर तर डिझेल 82.66रुपये लिटर झालाय. या दरवाढीचा परिणाम लवकरच वस्तू आणि सेवांवर होण्याची शक्यता आहे.
सौदी अरेबियाने तेलाच्या उत्पादनात घट केल्यामुळेच किमती वाढल्याचे पेट्रोलियममंत्री धमेंद्र प्रधान यांनी या आठवड्याच्या सुरुवातीला सांगितले होतं. करकपात करण्याबाबत त्यांनी कुठलेही आश्वासन दिले नव्हतं.
सातत्याने वाढणाऱ्या इंधनाच्या किमतींमुळे सरकारने इंधनावरील अबकारी करामध्ये कपात करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
पेट्रोल-डिझेलचे दर SMSच्या माध्यमातून देखील जाणून घेता येऊ शकतात. इंडियन ऑईलचे ग्राहक RSP लिहून 9224992249 या नंबरच्या माध्यमातून पेट्रोल डिझेलचे दर जाणून घेऊ शकतात.