मुंबई : देशभरात बलात्काराच्या घटना वाढत चालल्या आहेत. दर दोन मिनिटाला देशाच्या विविध भागात बलात्काराच्या घटना घडत असतात. या सर्व घटनांत लैंगिक छळ प्रकरणाच्या एका घटनेत मुंबई उच्च न्यायालयाने महत्वपूर्ण निकाल दिला आहे. चुंबन घेणं आणि प्रायव्हेट पार्टला स्पर्श करणे यावर न्यायालयाने महत्वाचा निकाल दिला आहे.
अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी एफआयआरमध्ये दिलेल्या तक्रारीनुसार, मुलीच्या वडिलांना त्यांच्या कपाटातून काही पैसे गायब झाल्याचे आढळले होते. या प्रकरणी स्वत:च्या अल्पवयीन मुलीची चौकशी केली असता तिने धक्कादायक खुलासे केले. मुलीने ऑनलाइन गेम रिचार्ज करण्यासाठी आरोपीला पैसे दिल्याचे सांगितले. तसेच आरोपीने तिचे चुंबन घेतले आणि तिच्या प्रायव्हेट पार्टला स्पर्श केल्याचे सांगितले. या प्रकरणी वडिलांनी पोक्सो कायदा आणि कलम ३७७ विरोधात एफआयआर दाखल केला होता.
न्यायालयाचा निकाल काय ?
लैंगिक छळ प्रकरणाच्या सुनावणी प्रकरणात निकाल देताना न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई म्हणाल्या, "पीडित महिलेचे विधान तसेच एफआयआरमधील तक्रारीनुसार अशी माहिती मिळते की, अर्जदाराने पीडितेच्या खाजगी भागांना स्पर्श केला होता आणि तिच्या ओठांवर चुंबन घेतले होते. मात्र चुंबन घेणे हा अनैसर्गिक गुन्हा नसल्याचा निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिला. भारतीय दंड संहितेच्या कलम ३७७ नुसार चुंबन घेणे आणि प्रेम करणे हा अनैसर्गिक गुन्हा नाही, असा निकाल दिला.
न्यायमूर्ती प्रभुदेसाई पुढे म्हणाल्या, मुलाच्या वैद्यकीय तपासणीत लैंगिक अत्याचाराची पुष्टी झाली नाही. त्यातचं आरोपीने यापूर्वीच एक वर्ष कोठडीत काढले आहे, त्यामुळे तो जामिनाचा हक्कदार आहे. न्यायालयाने त्या व्यक्तीला 30,000 रुपयांचा जामीन भरण्यास सांगत, अल्पवयीन मुलीच्या लैंगिक अत्याचार प्रकरणात जामीन मंजूर केला.