मुंबई : महाराष्ट्र शिखर बँकेच्या गैरव्यवहारात नाबार्डच्या अहवालामध्ये रोहित पवार एका कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत असे सांगत किरीट सोमय्या यांनी पवार घराण्यातील नवीन पिढीलाही लक्ष्य केलंय. अजित पवारांसोबत रोहित पवार यांचेही नाव शिखर बँक गैरव्यवहारात समोर आले असल्याचा धक्कादायक खुलासा महाराष्ट्र भाजपचे उपाध्यक्ष किरीट सोमय्या यांनी केल्याने एका नवीन राजकीय वादळाला सुरुवात होणार आहे.
पीएमसी बँक घोटाळ्यात एचडीआयएल कंपनीकडं असलेल्या दोन विमानापैकी एक विमान राजकीय पक्ष सातत्यानं वापरत असल्याचा आरोप भाजपचे उपाध्यक्ष किरीट सोमय्या यांनी केला आहे. मुंबई विमानतळाजवळ झोपडीचे एसआरए अंतर्गत प्रफुल पटेल आणि तत्कालीन सरकारनं कंपनीला नियमबाह्य 10 हजार कोटी रुपयांचा फायदा मिळवून दिला.
तसेच थेट निम्मी जागा एफएसआयसह या कंपनीला देण्याचा इमोयू केला गेला. ईडी आणि ईओडब्ल्यूला याची चौकशी करण्यासाठीचे कागदपत्र दिल्याचं सोमय्या यांनी म्हटलं आहे.