सोमय्यांना गरबा भोवला, रेल्वे समितीतून डच्चू

मुंबई भाजपच्या रेल्वे समितीतून किरीट सोमय्या यांना डच्चू मिळालाय एलफिन्स्टन इथे झालेल्या चेंगराचेंगरीच्या दिवशी सोमय्या रात्री गरबा खेळले होते.

Updated: Oct 1, 2017, 07:59 PM IST
सोमय्यांना गरबा भोवला, रेल्वे समितीतून डच्चू title=

मुंबई : मुंबई भाजपच्या रेल्वे समितीतून किरीट सोमय्या यांना डच्चू मिळालाय एलफिन्स्टन इथे झालेल्या चेंगराचेंगरीच्या दिवशी सोमय्या रात्री गरबा खेळले होते. तो गरबा किरीट सोमय्या यांना भोवल्याचं बोललं जातंय.

एलफिन्स्टन दूर्घटनेनंतर किरीट सोमय्या यांचा एक व्हडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओच त्यांच्यावरील टीकेचे कारण ठरला आहे.

सोशल मीडियात व्हायरल झालेल्या व्हिडिओत किरीट सोमय्या गरबा खेळताना दिसत आहेत. हा व्हिडिओ नेमका कधीचा आहे याबाबत पुष्ठी झालेली नाही. मात्र, ज्या दिवशी सकाळी एलफिन्स्टन दूर्घटना घडली त्याच रात्रीचा हा व्हिडिओ असल्याचे सोशल मीडियातून सांगितले जात आहे.

एलफिस्टन पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीत २३ जणांचा मृत्यू झाला होता. या अपघाताला २४ तासही उलटले नाहीत तोवर जबाबदार लोकप्रतिनीधी म्हणवून घेणारे सोमय्या हे गरबा खेळण्यात व्यग्र झाल्याचे या व्हिडिओत दिसत आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सोमय्या यांचा गरबा खेळतानाचा फोटो ट्विट करून निशाणा साधला आहे. सोशल मीडियावरूनही सोमय्या यांच्यावर प्रचंड टीका होत आहे.