मुंबई लोकलमध्ये किकी डान्स, स्टेशनची साफसफाईची शिक्षा

 मुंबईतील रेल्वे स्थानकांवर लोकलमध्ये अशाच प्रकारे 'किकी' स्टंट करुन जीव धोक्यात घालणाऱ्या एका तरुणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि तो पोलिसांच्या हाती लागला. 

Updated: Aug 9, 2018, 08:29 PM IST
मुंबई लोकलमध्ये किकी डान्स, स्टेशनची साफसफाईची शिक्षा title=

मुंबई : जगभरात सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरलेल्या 'किकी चॅलेंज'चे वेड अनेक तरुणांना लागले आहे. मुंबईतील रेल्वे स्थानकांवर लोकलमध्ये अशाच प्रकारे 'किकी' स्टंट करुन जीव धोक्यात घालणाऱ्या एका तरुणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि तो पोलिसांच्या हाती लागला. त्याला विरारमधून ताब्यात घेण्यात आलं आहे. त्याच्या इतर साथीदारांनाही पकडले आहे.

किकी चॅलेंजची मुंबईतही लागण, लोकलमधला व्हिडिओ व्हायरल

'किकी' चँलेंज घेऊन धावत्या रेल्वेतून गाण्यांवर नाचणाऱ्या अटकेत असलेल्या तिघा तरुणांना न्यायालयाने रेल्वे स्टेशनची साफसफाई करण्याची शिक्षा दिलीय. पालघर जिल्ह्यातल्या या तिघा तरुणांना तीन दिवस वसईचं स्टेशन साफ करावं लागणार आहे. आज त्यांच्या शिक्षेचा पहिला दिवस होता. आज या तिघांना स्टेशन साफ करावं लागलं. आता उद्या आणि परवाही त्यांना स्टेशनची साफसफाई करावी लागणार आहे. 

श्याम शर्मा (२४), ध्रृव शाह (२३) आणि निशांत (२०) असं या तिघा तरुणांचं नाव आहे. वसई स्टेशनवर या तिघांनी केलेल्या या जीवघेण्या कारनाम्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर या तिघांवर अ़टकेची कारवाई करून तिघांना वसई कोर्टात हजर करण्यात आलं. न्यायालयानं या तिघांना स्टेशन स्वच्छ करण्याची शिक्षा दिली. 

दरम्यान, लोकलमध्ये किकी स्टंट करतानाचा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला होता. हा व्हिडिओ युटयूब आणि इन्स्टाग्राम अकाऊंटवरून अपलोड करण्यात आला होता.