हिमांशू रॉय-जयंत पाटील यांची कालच जिममध्ये भेट

 माजी एटीएस प्रमुख हिमांशू रॉय यांनी आत्महत्या केली आहे.

Updated: May 11, 2018, 07:58 PM IST
हिमांशू रॉय-जयंत पाटील यांची कालच जिममध्ये भेट  title=

मुंबई : माजी एटीएस प्रमुख हिमांशू रॉय यांनी आत्महत्या केली आहे. हिमांशू रॉय हे बोर्नमॅरो कॅन्सर या आजाराने ग्रस्त होते. हिमांशू रॉय यांनी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. हिमांशू रॉय यांनी अनेक हायप्रोफाईल केसेस धसास लावल्या होत्या. हिमांशू रॉय यांनी अनेक मोठ मोठे आणि गुंतागुंतीचे गुन्हे देखील बाहेर आणले. आयपीएल बेटिंग-ललीत मोदी प्रकरण, जेडे मर्डर केस हिमांशू रॉय यांनी उघड केली आहे. हिमांशू रॉय अनेक केसेस पर्सनली मॉनिटर करत होते. हिमांशू रॉय हे बॉडीबिल्डर ऑफिसर होते. शरीर यष्टीने अतिशय फिट असे हिमांशू रॉय होते, हिमांशू रॉय मागील एक दीड वर्षापासून मेडिकल लिव्हवर होते. हिमांशू रॉय आपल्या शेवटच्या काळात अतिशय विक होते, असंही सांगण्यात येत आहे.

हिमांशू रॉय-जयंत पाटील यांची कालच झाली भेट

हिमांशू रॉय आणि जयंत पाटील यांची कालच जिममध्ये भेट झाली होती. हिमांशू रॉय यांच्या मृत्यूनंतर जयंत पाटील यांनी झी 24 तास शी बोलताना दोघांमध्ये काय चर्चा झाली याबाबत माहिती दिली. दोन वर्षांपूर्वी मला कॅन्सर झाल्याचं रॉय यांनी सांगितल्याचं जयंत पाटील म्हणाले. यावेळी रॉय यांनी नोकरी सोडण्याबाबतही भाष्यं केलं होतं. मला नोकरी सोडून कॅन्सरचा सामना करायचा आहे असं रॉय म्हणाले होते. पण नोकरी सोडण्याऐवजी रजा घ्या, असा सल्ला जयंत पाटील यांनी दिला होता.

जयंत पाटील यांच्या सल्ल्यानंतर हिमांशू रॉय सुट्टीवर गेले आणि मग कॅन्सरवर विजय मिळवल्याचं त्यांनी आपल्याला सांगितल्याचं जयंत पाटील म्हणाले. यानंतर त्यांचा कॅन्सर परत उलटला आणि ते काल मला भेटल्याची प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली. केमोथेरपीचा त्रास होत असल्यामुळे चेहरा करपलेला दिसत असल्याचं हिमांशू रॉय यांनी जयंत पाटील यांना काल सांगितलं. डॉक्टरांनी सगळं व्यवस्थित असल्याचं सांगितलं पण तरीही केमोथेरपी किती काळ घ्यायची? केमोथेरपीमुळे ते व्यथित होते, असं जयंत पाटील म्हणाले.