अमेरिकेत इस्रायल समर्थक वृद्धाकडून 6 वर्षीय मुलाची हत्या, 26 वार केले; कारण तो पॅलेस्टिनी होता!

Israel-Hamas War: पोलिसांनी या निर्घृण हत्येचा संबंध इस्रायल-हमास युद्धाशी जोडला असून पीडित दोघे मुस्लिम असल्याने संशयिताने त्यांना लक्ष्य केले असल्याचे सांगितले आहे.

Pravin Dabholkar | Updated: Oct 16, 2023, 12:19 PM IST
अमेरिकेत इस्रायल समर्थक वृद्धाकडून 6 वर्षीय मुलाची हत्या, 26 वार केले; कारण तो पॅलेस्टिनी होता! title=

Israel-Hamas War : हमास आणि इस्रायलमध्ये सुरू असलेल्या युद्धामध्ये आतापर्यंत हजारो निष्पापांचा बळी गेला आहे. या युद्धाचे जगातील विविध भागातही पडसाद दिसू लागले आहेत. काहीजण यामध्ये इस्रायलची बाजू घेत आहेत, तर काहीजण पॅलेस्टाइनच्या बाजून उभे आहेत. दरम्यान या युद्धानंतर पॅलिस्टानी चिमुरड्याबद्दल द्वेष मनात बाळगून त्याच्यावर चाकूचे वार करण्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.अमेरिकेच्या इलिनॉय राज्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला. येथे एका 71 वर्षीय व्यक्तीने महिला आणि तिच्या अवघ्या 6 वर्षाच्या मुलावर एक-दोनदा नव्हे तर तर तब्बल 26 चाकूचे वार केले आहेत.

पोलिसांनी या निर्घृण हत्येचा संबंध इस्रायल-हमास युद्धाशी जोडला असून पीडित दोघे मुस्लिम असल्याने संशयिताने त्यांना लक्ष्य केले असल्याचे सांगितले आहे. जोसेफ काझुबा असे आरोपीचे नाव असून तो 71 वर्षांचा आहे. 26 वार झेलल्यानंतर निष्पाप मुलाची अवस्था गंभीर झाली. या  अवस्थेत त्याला रुग्णालयात नेण्यात आले. पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

या खून प्रकरणात अमेरिकन घरमालकावर खून आणि द्वेषाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या क्रूर हल्ल्यात मुस्लिम मुलांचा बळी गेला आहे.  त्यामुळे याचा हमास-इस्रायल युद्धाची संबंध लावला जात आहे.  

ही हत्येची घटना शिकागोच्या पश्चिमेला 64 किलोमीटरवर घडली आहे. मृत पावलेल्या मुलाचे राष्ट्रीयत्व जाहीर करण्यात आले नसले अमेरिकन-इस्लामिक रिलेशन्सच्या शिकागो कार्यालयाने मुलाचे वर्णन पॅलेस्टिनी-अमेरिकन असे केले आहे.

इलिनॉयमधील विल काउंटी शेरीफ कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, जखमी महिलेची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. पॅलेस्टिनी संघटनेने मजबूत तटबंदीच्या सीमा तोडून 1,400 हून अधिक लोकांना गोळ्या घालून ठार मारले आणि जाळल्याचे वृत्त समोर आले. यानंतर इस्रायलने हमासविरुद्ध युद्ध घोषित केले. इस्रायलने केलेल्या बॉम्बस्फोटाने पॅलिस्टाइनची अनेक क्षेत्र उद्ध्वस्त झाली.  गाझा पट्टीमध्ये किमान 2,670 लोक मारले गेले. ज्यापैकी बहुसंख्य नागरिक होते.

अमेरिकन शहरांमधील पोलिस आणि फेडरल अधिकारी सेमिटिक किंवा इस्लामोफोबिक हिंसाचारानंतर हाय अलर्टवर आहेत. काही ज्यू आणि मुस्लिम गटांकडून सोशल मीडियावर द्वेषपूर्ण आणि धमकावणारी विधाने केली जात आहेत. या युद्धात आत्तापर्यंत इस्रायलमध्ये 1400 लोकांचा मृत्यू झाला असून 3400 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. तर गाझामध्ये 2670 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर वेस्ट बँकमध्ये 56 लोकांचा मृत्यू झाला आहे.