Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या संपत्तीचं प्रकरण हायकोर्टात

ठाकरे कुटुंबाच्या संपत्तीची (Uddhav Thackeray Family) चौकशी करा अशी मागणी करणारी जनहित याचिका मुंबई हायकोर्टात दाखल झालीय.

Updated: Oct 19, 2022, 11:35 PM IST
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या संपत्तीचं प्रकरण हायकोर्टात title=

मेघा कुचिक, झी २४ तास, मुंबई : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासमोरच्या अडचणी काही थांबत नाहीयेत. आता ठाकरे कुटुंबाच्या मालमत्तेची (Thackeray Family Property) चौकशी करण्यात यावी अशी याचिका मुंबई हायकोर्टात (Bombay High Court) दाखल झालीय. काय आहे या याचिकेत ? पाहुयात. (investigate assets of uddhav thackeray family petition of gauri bhide and her father abhay bhide in bombay high court)

ठाकरेंच्या मालमत्तेचं प्रकरण हायकोर्टात

उद्धव ठाकरेंसमोरच्या अडचणी काही थांबताना दिसत नाहीयेत. आता ठाकरे कुटुंबाच्या संपत्तीची चौकशी करा अशी मागणी करणारी जनहित याचिका मुंबई हायकोर्टात दाखल झालीय. उद्धव ठाकरे आणि कुटुंबानं बेहिशीबी मालमत्ता जमवल्याचा आरोप याचिकेतून करण्यात आलाय. दादरमधील रहिवासी गौरी भिडे आणि त्यांचे वडील अभय भिडे यांनी ही याचिका दाखल केलीय. या याचिकेत नेमकं काय म्हटलंय? 

उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे नक्की काय करतात?

"सामना आणि मार्मिकच्या खपातून इतकी संपत्ती गोळा होणं अशक्य. सामना आणि मार्मिकचे ऑडिट ब्युरो ऑफ सर्क्युलेशनद्वारे ऑडिट का नाही? कोरोनात सामनाचा 42 कोटींचा टर्नओव्हर, जवळपास 11.50 कोटींचा नफा.  कोरोना काळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री तर आदित्य ठाकरे कॅबिनेट मंत्री. ठाकरे कुटुंबाने भ्रष्टाचाराच्या मार्गाने बेहिशेबी संपत्ती जमवल्याचा आरोप. मुंबईत आणि रायगड जिल्ह्यात प्रचंड मालमत्ता कशा? सामना, मार्मिकच्या विक्रीतून अफाट संपत्ती गोळा करणं अशक्य असल्याचा दावा. ठाकरेंकडे मालमत्ता कुठून आली याची ईडी, सीबीआय चौकशी करा"अशी मागणी या याचिकेतून करण्यात आलीय. 

दरम्यान जनतेंचं प्रेम हीच आमची संपत्ती अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरेंनी दिलीय. 

आजवर ठाकरेंच्या संपत्तीवरुन नारायण राणेंसह अनेकांनी आरोप केले. मात्र पहिल्यांदाच ठाकरेंच्या संपत्तीचं प्रकरण कोर्टात गेलंय. या याचिकेवर 16 नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे. शिवाजी पार्क आणि ऋतुजा लटकेंच्या प्रकरणात ठाकरेंच्या बाजून हायकोर्टानं निकाल दिला होता. मात्र आता मालमत्तेच्या प्रकरणात काय युक्तिवाद होतो, हायकोर्ट काय निर्णय देतं याचंच आता सर्वांना कुतूहल आहे.