आयसीआयसीआयच्या माजी अधिकारी चंदा कोचर यांची चौकशी

 चंदा कोचर आणि वेणुगोपाल धुत यांची चौकशी होत आहे. 

Updated: Mar 2, 2019, 04:53 PM IST
आयसीआयसीआयच्या माजी अधिकारी चंदा कोचर यांची चौकशी title=
चंदा कोचर, Image Source: reuters

मुंबई : आयसीआयसीआयच्या माजी कार्यकारी संचालक चंदा कोचर यांची आज चौकशी सुरु करण्यात आली आहे. कालच्या छाप्यांनंतर आज चौकशीसाठी बोलवले गेले. तसेच व्हीडीओकॉनचे वेणुगोपाल धुत यांचीही चौकशी होत आहे. या चौकशीसाठी चंदा कोचर, पती दीपक यांच्यासह मुंबईतल्या अंमलबजावणी संचालनालयाच्या कार्यालयात दाखल झाल्या आहेत. कर्जवाटपात व्हीडीओकॉनवर मेहेरबानी केल्याचा आरोप चंदा कोचर यांच्यावर आहे. काल संचालनालयाने कोचर आणि व्हीडीओकॉनचे धूत यांच्या कार्यालयांवर छापे घातले होते. त्यानंतर आज चौकशीसाठी बोलावले. 

ईडीचे अधिकारी चंदा आणि दीपक कोचर यांची वक्तव्य रेकॉर्ड करतील. कालच्या छाप्यादरम्यान कोचर आणि धूत यांच्या मालमत्तांमधली पाच ठिकाणं सील करण्यात आलीयत. अंमलबजावणी संचालनालयानं प्रिव्हेशन ऑफ मनी लॉन्डरिंग कायद्याअंतर्गत धूत आणि कोचर यांच्यावर आधीच गुन्हे दाखल केले आहेत.