मुंबई : 'परमबीर सिंग ( Param Bir Singh) यांनी केलेल्या आरोपाबाबत आपली चौकशी करा', अशी मागणी वर्षावरील मंत्रिमंडळ बैठकीदरम्यान गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी केली आहे. माझी चौकशी करा, "दूध का दूध, पानी का पानी" होऊन जाऊ दे, असे देशमुख यांनी ट्विट करताना म्हटले आहे. दरम्यान, चौकशीसाठी आता राज्य सरकार चौकशी आयोग नेमणार आहे, अशी माहिती स्वत: गृहमंत्री देशमुख यांनी दिली. निवारी परमबीर सिंग यांनी पत्र लिहून आरोप केल्यानंतरही अनिल देशमुख यांनी ही मागणी केलेली. अखेर चौकशी आयोग नेमण्याचा निर्णय झाला.
दरम्यान, दुसरीकडे रश्मी शुक्ला यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे. वर्षावरच्या बैठकीत चर्चा झाल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. IPS रश्मी शुक्ला यांनी गोपनीय माहिती चुकीच्या पद्धतीनं बाहेर दिली आणि प्रसार माध्यमातून ती माहिती बाहेर आली. त्याचप्रमाणे परवानगी नसतानाही फोन टॅपिंग केले. ऑफिशियल सिक्रेट कायद्यानुसार 1923 नुसार हा फौजदारी गुन्हा आहे. त्यामुळे रश्मी शुक्ला यांच्या विरोधात कारवाई होणार आहे.
मुख्यमंत्री महोदय, परमबीर सिंग यांनी माझ्यावर जे आरोप केलेत त्याबद्दल चौकशी लावून, "दूध का दूध, पानी का पानी" करावे अशी मागणी अनिल देशमुख यांनी केली आहे. चौकशी लावली तर, मी त्याचे स्वागत करीन. सत्यमेव जयते..., असे ट्विट अनिल देशमुख यांनी केले आहे.
मी माननीय मुख्यमंत्री महोदय यांना परमबीर सिंग यांनी माझ्यावर जे आरोप केलेत त्याबद्दल चौकशी लावून, "दूध का दूध, पानी का पानी" करावे अशी मागणी केली होती. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी याची चौकशी लावली तर, मी त्याचे स्वागत करीन.
सत्यमेव जयते... pic.twitter.com/f2oJjFhO8A— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) March 24, 2021
दरम्यान, अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांची चौकशी करण्याचा निर्णय महाविकास आघाडीने सरकार घेतला आहे आहे. या चौकशीसाठी राज्य सरकार चौकशी आयोग नेमणार आहे. यासाठी राज्यातील महाविकास आघाडी सरकार निवृत्त न्यायमूर्तींमार्फत चौकशी होणार आहे.
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर एक गाडी आणि त्यात स्फोटक सापडली. त्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले या प्रकरणी सचिन वाझे यांना अटक झाली तर दुसरीकडे मुंबई पोलीस आयुक्त पदावरून परमवीर सिंग यांनी उचलबांगडी झाली. परमवीर सिंग यांची बदली झाल्यावर नाराज परमवीर सिंग यांनी थेट मुख्यमंत्री आणि राज्यपालांना पत्र लिहिले. गृहमंत्र्यांनी सचिन वझे यान 100 कोटींचे टार्गेट दिल्याचा गंभीर आरोप केला आहे.
या आरोपनंतर विरोधकांनी जोरदार हल्लाबोल चढवला. परमवीर सिंग न्यायालयात गेले तर गृहमंत्र्यांनी या प्रकरणाची चौकशी करावी, अशीच भूमिका मांडली. राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी देखील माजी पोलीस अधिकारी ज्युलिओ रिबेरो यांच्यासारख्या अधिकाऱ्यांनी चौकशी करावी असे सूचीत केले आहे. दरम्यान, रिबेरो यांनी चौकशी करण्यास असमर्थता दर्शवली आहे.