मुंबईत भर रस्त्यात महिलेला अमानुष मारहाण

मुंबईतील खार येथे  भर रस्त्यात महिलेला अमानुष मारहाण करण्यात आली.

Updated: Feb 8, 2020, 10:46 PM IST
मुंबईत भर रस्त्यात महिलेला अमानुष मारहाण  title=

मुंबई : महाराष्ट्रात महिलांवर गेल्या काही दिवसात अत्याचाराच्या घटना वाढतच आहेत. अशीच घटना मुंबईतील खार येथे घडली. भर रस्त्यात महिलेला अमानुष मारहाण करण्यात आलीय. पीडित महिला एका एनजीओमध्ये काम करत असून अस्लम शेख असे मारहाण करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. ही ६ फेब्रुवारीची घटना असून खार पोलिसांनी अस्लमवर गुन्हा दाखल केला आहे.

भर रस्त्यात मारहाण करण्याची ही सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली आहे.. २९ जानेवारीला अस्लम शेखच्या घराबाहेर पाण्याचा टँकर उभा होता, त्यावरून त्याचे आणि पीडित महिलेचे भांडण झाले होते. याचाच राग धरून अस्लम शेख याने ६ फेब्रुवारीला पीडितेशी वाद घालू लागला. वाद इतका वाढला की अस्लम शेखने पीडितेला रस्त्यावर खेचून मारहाण केली. या घटनेबाबात खार पोलीस अधिक तपास करत आहेत.