मुंबई : एलफिन्स्टन दुर्घटनेच्या पार्श्वभुमीवर मुंबई आणि परिसरातील तीन फुटओव्हर ब्रीज लष्कराच्या मदतीने बांधण्यात येणार आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रेल्वेमंत्री आणि संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज एलफिन्स्टन रेल्वे स्थानकाची पाहणी केली.
लष्कराकडे आपतकालीन काळात ब्रीज बांधण्याचे तंत्रज्ञान आहे. कमीत कमी वेळेत ब्रीजचं काम पूर्ण करण्यात येणार आहे. तीन रेल्वे स्थानकातील फुटओव्हर ब्रीज बाधण्याचं काम करण्यात येणार आहे. यामध्ये एलफिन्स्टन, करी रोड, आंबिवली रेल्वे स्थानकातील एफओबीचा समावेश आहे. ३१ जानेवारीपर्यंत फुटओव्हर ब्रीज बांधण्याचं काम पूर्ण होणार आहे अशी माहिती मुख्यमंत्री आणि रेल्वेमंत्र्यांनी दिली आहे.
मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी रेल्वे मंत्र्याना पत्र लिहुन लष्काराच्या सहाय्याने ब्रीज बांधण्याची मागणी केली होती.