मुंबईत आणखी एका पुलाजवळ रस्त्याला तडे

पश्चिम रेल्वे वाहतूक पुन्हा एकदा रुळावर आलीय. अंधेरी रेल्वे रुळावर गोखले पुलाचा काही भाग कोसळून झालेल्या अपघातानंतर मंगळवारी बांद्रा ते गोरेगाव दरम्यान वाहतूक ठप्प झाली होती.

Updated: Jul 4, 2018, 11:17 AM IST
मुंबईत आणखी एका पुलाजवळ रस्त्याला तडे title=

मुंबई: ग्रँट रोड आणि नाना चौकला जोडणाऱ्या पुलाजवळ रस्त्याला तडे गेल्याचं समोर आलंय. त्यामुळे या पूलावरील वाहतूक थांबवण्यात आली असून, ही वाहतूक केनेडी ब्रीजवरून वळवण्यात आलीय रस्त्याची आणि पूलाची पहाणी करण्यासाठी महापालिकेचे कर्मचारी घटनास्थळी पोहचले आहेत.

केबलच्या ओझ्यानं गोखले पूल कोसळा?

दरम्यान, गोखले पूल कोसळून आता २४ तास उलटलेत. आणि पूल कोसळनंतरची आज वाहतूकही सुरू झालीय. पण पूल कोसळल्याचं खरं कारण आता झी २४ तासच्या हाती लागलंय. पूलाखालून टाकण्यात आलेल्या केबलच्या ओझ्यानं गोखले पूल कोसळल्याचा दावा रेल्वेच्या माजी अधिकाऱ्यांनी केलाय. झी २४ तासशी बोलताना मध्य रेल्वेचे माजी अधिकारी शशिकांत लिमयेंनी पूल नेमका कसा पडला याची माहिती दिली.

पश्चिम रेल्वे वाहतूक पुन्हा एकदा रुळावर 

दरम्यान, पश्चिम रेल्वे वाहतूक पुन्हा एकदा रुळावर आलीय. अंधेरी रेल्वे रुळावर गोखले पुलाचा काही भाग कोसळून झालेल्या अपघातानंतर मंगळवारी बांद्रा ते गोरेगाव दरम्यान वाहतूक ठप्प झाली होती. आता रेल्वे वाहतूक पूर्ववत झालीय. जलद पाठोपाठ चर्चगेट-अंधेरी दरम्यान धिम्या मार्गावरील वाहतूकही सुरू झालीय. सुरक्षेचा उपाय म्हणून अंधेरी दरम्यान रेल्वे धिम्या गतीने चालवण्यात येत असल्याने आजही  मुंबईकरांना मनस्ताप होण्याची शक्यता आहे.