MPSC च्या परीक्षेसंदर्भात महत्वाची बातमी

MPSC ची परीक्षा वेळापत्रकानुसारच होणार 

Updated: Apr 6, 2021, 06:30 PM IST
MPSC च्या परीक्षेसंदर्भात महत्वाची बातमी  title=

मुंबई : गेले काही दिवस MPSC परीक्षेच्या मुद्द्यावर राज्यातील वातावरण तापले होते. यावरुन राज्य सरकारवर टीका केली जात होती. पण आता संदर्भात महत्वाचा निर्णय समोर आलाय. MPSC ची परीक्षा वेळापत्रकानुसारच होणार आहे. 

संयुक्त पूर्व परीक्षा गट ब परीक्षा रविवारी ११ एप्रिल रोजी MPSC ची परीक्षा होणार आहे. परीक्षेच्या तारखेत कोणताही बदल होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. योग्य ती खबरदारी आणि नियमांचे पालन होऊन परीक्षा पार पाडली जाणार असल्याचे सांगण्यात आले. 

एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. त्यानंतर एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन करुन आपला राग व्यक्त केला. विरोधी पक्षाने देखील राज्य सरकारवर जोरदार टीका केली होती.