आचारसंहितेच्या काळात बांधकाम माफियांना रान मोकळं

लोकसभा निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यापासून मुंबईत बेकायदा बांधकाम करणाऱ्या माफियांना रान मोकळं झाल्यासारखी स्थिती आहे.

Updated: May 6, 2019, 10:21 PM IST
आचारसंहितेच्या काळात बांधकाम माफियांना रान मोकळं  title=

मुंबई : निवडणुकीच्या काळात मुंबईत हजारो बेकायदा बांधकामं उभी राहिली आहेत.  लोकसभा निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यापासून मुंबईत बेकायदा बांधकाम करणाऱ्या माफियांना रान मोकळं झाल्यासारखी स्थिती आहे. गेल्या दोन महिन्यांत मुंबईत शेकडो बेकायदा बांधकामं उभी राहिलीयत. GFXIN फेब्रुवारी महिन्यात अनधिकृत बांधकामाच्या ३ हजार ६२१ तक्रारी दाखल झाल्या. त्यापैकी १हजार ७१८ तक्रारींचं निवारण झालं.

मार्च महिन्यात ४ हजार १४६ तक्रारी दाखल झाल्या आणि त्यापैकी १हजार २७८ तक्रारींचं निवारण झालं. एप्रिल महिन्यात ४ हजार १०९ तक्रारी आल्या त्यातल्या केवळ ४४१ तक्रारींचं निवारण झालं GFXOUT चेंबूरच्या गांधी मार्केटमध्ये दोन महिन्यापूर्वी तोडण्यात आलेले दुकानाचे गाळे पुन्हा उभारण्याचं काम सुरू आहे.

आचारसंहिता लागू असली तरी निवडणुकीचं काम मात्र संपलंय. असं असताना बेकायदा बांधकामांवर पुन्हा हातोडा पडणं गरजेचं होतं. पण अधिकाऱ्यांनी जाणूनबुजून माफियांसाठी रान मोकळं ठेवलंय की काय अशी स्थिती मुंबईमध्ये निर्माण झालीय.