बहुजन समाजाची इच्छा असेल तर राजकीय पक्ष काढणार - संभाजीराजे

खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी आज पत्रकार परिषदेत मराठा आरक्षणावरुन आक्रमक भूमिका मांडली. येत्या काही दिवसात जर निर्णय झाला नाही तर ६ जूननंतर आंदोलनाचा इशारा देखील त्यांनी दिला. या आंदोलनात मी सर्वात पुढे असेल असं देखील त्यांनी म्हटलं.

Updated: May 28, 2021, 06:30 PM IST
बहुजन समाजाची इच्छा असेल तर राजकीय पक्ष काढणार - संभाजीराजे title=

मुंबई : खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी आज पत्रकार परिषदेत मराठा आरक्षणावरुन आक्रमक भूमिका मांडली. येत्या काही दिवसात जर निर्णय झाला नाही तर ६ जूननंतर आंदोलनाचा इशारा देखील त्यांनी दिला. या आंदोलनात मी सर्वात पुढे असेल असं देखील त्यांनी म्हटलं.

संभाजीराजे यांनी म्हटलं की, 'आम्ही कुठल्याही पक्षाच्या विरोधात नाही. आमचा कुठलाही राजकीय अजेंडा नाही. एकच विषय मराठा समाजाला न्याय मिळावा. 2007 पासून या विषयाला घेऊन राज्य पिंजून काढत आहे. मराठा समाजावर आज अन्याय होतोय. मी मराठा समाजाच नेतृत्व म्हणून नव्हे तर शिपाई गडी म्हणून या ठिकाणी आलोय.'

मराठा सामाजिक मागास राहिला नाही हे लक्षात घेतलं पाहिजे. न्यायालयाने तसे संबोधले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला आवाहन देऊ शकत नाही. सामंजस्याची भूमिका घेतली. राजीनामा देऊन आरक्षण मिळत असेल तर आता राजीनामा देतो. असं देखील त्यांनी म्हटलंय.

सर्व पक्षीय बैठक मुख्यमंत्र्यांनी लवकर बोलवावी. शरद पवार यांनी ही या बैठकीला उपस्थित राहावे. असं देखील त्यांनी म्हटलं आहे.