मुंबई : बीकेसी कोविड सेंटरमध्ये मनसेच्या शिष्टमंडळाने भेट दिली. कोविड सेंटरचे डीन डॉ. राजेश ढेरे यांची शिष्टमंडळाने भेट घेतलीय. बीकेसी कोविड सेंटरमध्ये एमबीबीएस डॉक्टरांचा अभाव आहे. आयसीयूमध्ये डॉक्टरांची नियुक्ती करणा-या कंत्राटदाराने आयुर्वेदीक, युनानी, होमिओपथी, डेंटर डॉक्टरांची नेमणूक केल्याचा आरोप करण्यात येतोय. या डॉक्टरांचा आयसीयूशी काय संबंध असा सवाल मनसेनं केलाय.
दरम्यान बीकेसी कोविड सेंटरचे डीन डॉ. ढेरे यांना या कंत्राटदाराबद्दल विचारणा केली असता हा कंत्राटदार मंत्री नवाब मलिक यांचा व्यक्ती असल्याचं ढेरेंनी सांगितलंय. त्याचबरोबर कोविड सेंटरमधल्या एका व्यक्तीनं तक्रार केल्यामुळे अंडी बंद करण्यात आल्याची कबुली डॉ. ढेरेंनी दिलीय. त्यावर जैन-गुजरात्यांची नाटकं बंद करा असा दम संदीप देशपांडेंनी दिलाय.
देशपांडेंनी काय केले आरोप
'बीकेसी कोविड सेंटरमध्ये डॉक्टरांची कमतरता आहे. जे डॉक्टर याठिकाणी असायला हवे आहेत. ते या ठिकाणी नाहीत. ते दुसरीकडे काम करत आहेत. रूग्णांना उपचार नीट द्या. त्यांचे जीव घेवू नका.' असं देशपांडे म्हणाले. शिवाय काम न सुधारल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.